बुलडाणा: गर्दे वाचनालय ग्रंथांच्या माध्यमातून मागील १०० वर्षांपासून ज्ञानदानाचे कार्य करीत आहे. ग्रंथ हेच जीवनाचे मार्गदर्शक आहेत, असे प्रतिपादन अॅड. बाळासाहेब कविमंडन यांनी केले. ते गर्दे वाचनालयात आयोजित केलेल्या विविध विषयांवरील नवीन पुस्तकांच्या प्रदर्शनाचे उद्घाटन प्रसंगी बोलत होते. उदघाटक म्हणून अॅड. गणेश कविमंडन होते तर अध्यक्षस्थानी माजी नगराध्यक्ष तथा गर्दे वाचनालयाचे अध्यक्ष गोकुल शर्मा हे होते. याप्रसंगी ‘वादळवाट’ या पुस्तकाच्या लेखिका अर्चना देव, बाळासाहेब देशपांडे, नगर सेवक तथा गर्दे वाचनालयाचे कार्यवाह उदय देशपांडे हे उपस्थित होते. प्रास्ताविक नेमीनाथ सातपुते यांनी केले. गर्दे वाचानालय हे सांस्कृतिक केंद्र आहे. विविध कार्यक्रमांसाठी या सभागृहात संपूर्ण महाराष्ट्रातून अनेक कला क्षेत्रातील मान्यवर येतात आणि वाचनालयाच्या कार्याबद्दल कौतुकाची थाप देवून जातात, असे मत अर्चना देव यांनी व्यक्त केले. अर्चना देव यांनी पौगंडावस्थेतील मुलींसाठी समुपदेशनात्मक लिहिलेल्या साहित्य प्रसार केंद्र, नागपूरने प्रकाशित केलेल्या ‘वादळवाटा’ या पुस्तकाला ग्रंथालय भारती या ग्रंथालय क्षेत्रात काम करणाºया संस्थेचा पद्मभूषण अशोक कुकडे आणि खासदार तरूण विजय यांचे हस्ते उत्कृष्ट साहित्य निर्मितीचा राज्यस्तरीय पुरस्कार मिळाल्याबद्दल गर्दे वाचनालयाच्या वतीने अर्चना देव यांचा शाल, श्रीफळ देवून सत्कार करण्यात आला. कार्यक्रमाला महात्मा फुले वाचनालयाचे अध्यक्ष पी. एन. बोदडे, सचिव सातव, रविन्द्र कुळकर्णी, अॅड.अमोल बल्लाळ, अॅड.रामानंद कविमंडन, अॅड. प्रदीप कविमंडन, शंकरराव कºहाडे, डॉ. नंदिनीताई रिंठे, प्रा. विजयराव जोशी, चंद्रशेखर जोशी, सपना सातपुते, धनंजय देव, प्रकाश सातव, मधुकरराव किंबहुने, रविकिरण टाकळकर, प्रा. शिंगणे, सुहास ठोके, वैशाली जाधव यांच्यासह वाचक व सभासद उपस्थित होते. कार्यक्रमाचे संचालन सचिन बल्लाळ यांनी केले. आभार रविंद्र कुळकर्णी यांनी मानले. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी नेमीनाथ सातपुते, श्रीकांत कुळकर्णी, सचिन बल्लाळ, अनिल पालकर, सुनील सरकटे यांनी परिश्रम घेतले.
ग्रंथ हे जीवनाचे मार्गदर्शक - अॅड. बाळासाहेब कविमंडन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 20, 2019 5:55 PM