गुरुवारी प्रयोगशाळेत ६४९ जणांचे अहवाल तपासण्यात आले होते. त्यापैकी २१ टक्के व्यक्ती बाधित असल्याचे समोर आले तर ५१५ जणांचे अहवाल निगेटिव्ह आले आहेत.
पॉझिटिव्ह आलेल्यांमध्ये मलकापूर १५, शेगाव पाच, बुलडाणा ३०, सागवण दोन, नाद्राकोळी एक, सुंदरखेड दोन, नांदुरा एक, अकोला खुर्द एक, झाडेगाव एक, वाडी खुर्द एक, आसलगाव एक, चिखली ३०, मंगरूळ नवघरे एक, अमडापूर दोन, पिंपळवाडी एक, खैरव दोन, अंत्री कोळी तीन, धोत्रा भनगोजी दोन, तेल्हारा दोन, देऊळगाव घुबे एक, सावरखेड एक, मोताळा दोन, खामगाव १२, सुटाळा बुद्रूक एक, घाणेगाव एक, देऊळगाव राजा एक, भिवगण एक, सिनगांव जहागीर एक, अंढेरा एक, डोढ्रा एक, जांभोरा एक, सि. राजा दोन, सुलतानपूर दोन आणि जालना जिल्ह्यातील माहोरा येथील एका बाधिताचा यामध्ये समावेश आहे. उपचारादरम्यान जिल्ह्यात गुरुवारी दोघांचा मृत्यू झाला. यामध्ये बुलडाणा तालुक्यातील अजिसपूर येथील ६२ वर्षीय व्यक्ती व मलकापूर येथील ८४ वर्षीय व्यक्तीचा समावेश आहे.
काेरोनावर मात केलेल्या ६६ जणांना रुग्णालयातून सुटी देण्यात आली आहे. यामध्ये बुलडाणा येथून ३२, नांदुरा चार, खामगाव सात, लोणार दाेन, चिखली चार, देऊळगाव राजा दहा, शेगाव दोन, मलकापूर तीन, सिंदखेड राजा येथील दोघांचा समावेश आहे.
--१,१६,९०७ जणांचे अहवाल निगेटिव्ह--
आजपर्यंत तपासणी करण्यात आलेल्या संदिग्धांपैकी १ लाख १६ हजार ९०७ जणांचे अहवाल निगेटिव्ह आले आहेत. तर १४,३२९ जणांनी कोरोनावर मात केल्यामुळे त्यांना रुग्णालयातून सुटी देण्यात आली आहे. प्रयोगशाळेमध्ये तपासणीसाठी पाठविण्यात आलेल्या १,४५५ संदिग्धांच्या अहवालाची अद्याप प्रतीक्षा आहे. जिल्ह्यातील एकूण कोरोनाबाधितांची संख्या १५ हजार ३५९ झाली आहे. यापैकी ८४९ सक्रिय रुग्ण असून त्यांच्यावर रुग्णालयात उपचार सुरू आहेत.