यामध्ये अमर शंकर बनसोडे (१४) आणि टिंकू परमेश्वर बनसोडे (१२) या दोघांचा मृत्यू झाला आहे. दरम्यान, टिंकूचा भाऊ सुमित परमेश्वर बनसोडे याचे ग्रामस्थांच्या सतर्कतेमुळे प्राण वाचले आहे. त्यास तंटामुक्त समितीचे अध्यक्ष सुरेश चेके, भुजंग चेके, जगदेव चेके, गजानन चेके यांनी तातडीने देऊळगाव मही येथील ग्रामीण रुग्णालयामध्ये उपचारांसाठी हलविले. तेथून त्यास जालना येथे पुढील उपचारांसाठी पाठविण्यात आले आहे. उपरोक्त तिघे भावंडे ही शेततळ्यावर पोहोण्यासाठी गेली होती. दोघे पाण्यात बुडत असताना सुमितने त्यांना वाचविण्याचा प्रयत्न केला. मात्र तोही पाण्यात बुडत असताना त्याने आरडाओरड केल्याने स्थानिक नागरिक मदतीसाठी धावून आले. त्यामुळे सुमितचे प्राण वाचविण्यात यश आले. दरम्यान, अन्य दोघा मृतकांचे पार्थिव हे देऊळगाव मही येथील ग्रामीण रुग्णालयामध्ये उपचारांसाठी पाठविण्यात आले आहेत. या घटनेची माहिती मिळाल्यानंतर अंढेरा पोलीस ठाण्याचे पोलीस कॉन्स्टेबल राठोड यांनी लगोलग घटनास्थळ गाठून पंचनामा केला. घटनेचा पुढील तपास अंढेरा पोलीस करत आहेत. या दुर्दैवी घटनेमुळे वाकी बुद्रूक गावावर शोककळा पसरली आहे.
शेततळ्यात बुडून दोघांचा मृत्यू
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 08, 2021 4:23 AM