चिखली : दिवसाची सुरुवात शिवरायांना नमन करून व्हावी़ म्हणून पश्चिम महाराष्ट्रात असंख्य ठिकाणी शेतांमध्ये आणि घराघरांत शिवभक्तांनी शिवाजी महाराजांचे लहान, मोठे पुतळे उभारले आहेत. नेहमीच स्फूर्ती मिळत राहावी म्हणून आपल्या जिल्ह्यातही शिवप्रेमींनी घराघरांत आणि शेतशिवारांमध्ये आपापल्या परीने शिवरायांचे पुतळे उभारून नैसर्गिक वातावरण शिवमय राहावे या हेतूने चिखली केबल नेटवर्कच्या सदस्यांनी शेतात शिवरायांचा सिंहासनाधिष्ठीत पुतळा बसविला असून या पुतळ्याचे अनावरण २२ फेब्रुवारी रोजी पार पडले.
येथील प्रफुल्ल देशमुख, माधव मोरपल्ले, श्रीराम नागरी पतसंस्थाचे शाखा व्यवस्थापक सुनील जामदार, राजू मेहरा, राजू खरात, गजानन पठाडे, राहुल गुळवे, गोपाल तुपकर यांनी पश्चिम महाराष्ट्राच्या धर्तीवरच सिंहासनावर आरूढ झालेला शिवरायांच्या पुतळा तुपकर यांच्या शेतात उभारला आहे. या पुतळ्याचे अनावरण २२ फेब्रुवारी रोजी माजी आमदार राहुल बोंद्रे, चिखली अर्बनचे अध्यक्ष सतीश गुप्त, नगराध्यक्षा प्रिया बोंद्रे, न.प.उपाध्यक्ष वजीराबी शेख अनिस व जि.प.सदस्या जयश्री शेळके, डॉ.ज्योती खेडेकर यांच्या हस्ते करण्यात आले. सकाळी विधिवत पूजा अर्चा करून महारांचा पुतळा गौरव तुपकर आणि स्वराज तुपकर यांच्या हस्ते प्राणप्रतिष्ठा करण्यात आली: तद्नंतर आलेल्या मान्यवरांच्या उपस्थितीत शिवभक्त विठ्ठल राजे व त्यांच्या टीमने आरती केली. यावेळी पत्रकार अनिल म्हस्के, सुधीर चेके पाटील, संदीप चव्हाण, अमोल पोधाडे, डॉ.शिवशंकर खेडेकर, शेख अनिस, गणेश बरबडे, राजू परिहार, शिवराज पाटील, गजानन तारू, डॉ.मो.इसरार, जकाऊल्ला खान, रोहित खेडेकर, नाना देशमाने, साहेबराव पाटील, जावेद, शिवाजी साखरे, भोगावतीचे सरपंच जावेद, सर्व सदस्य, ग्रामसेविका सरकटे, राजू कमळसकर, गजू डुकरे, कैलास सोनुने, पिंटू वाडेकर, गजानन देव्हडे, कैलास गाडेकर, विनोद खरे, युसुफ शेख रवी फोलाने, मंगेश पळसकर, पवन लढा, आकाश डोणगावकर, शुभम तुपकर, समीर शेख, प्रसाद देशमुख, राहुल मान्टे व निलकमल ढोल पथक उपस्थित होते. संचालन श्याम वाकदकर यांनी केले