लोकमत न्यूज नेटवर्कहिवरा आश्रम : मेहकर तालुक्यातील ब्रह्मपुरी येथे वारंवार दारू बंद करण्याची मागणी केल्यावरही अवैध दारूची विक्री सुरू असल्यामुळे अखेरीस महिलाच मैदानात उतरल्या आहेत. गावातील महिलांनी गुरुवारी रात्री दारूसह वाहतूक करणारे वाहन व चालकांना पकडून पोलिसांच्या हवाली केले. ब्रह्मपुरी गावात दारूची विक्री जोमात सुरू आहे. दारूमुळे अनेकांचे घर संसार उद्ध्वस्त झालेले आहेत. शेतात महिला राबराब राबतात. त्यांचे पती त्यांना पैशासाठी त्रास देऊन दारू पिण्यासाठी पैसे मागतात. गावातील दारूविक्री रोखण्याकरिता १ मे रोजी ग्रामसभेत ठराव घेण्यात आला. मात्र, असे असतानाही दारूविक्री सुरू असल्यामुळे गुरुवारी रात्री ११ वाजताच्या सुमारास गावात एम.एच.२८ ए.बी.४१२३ क्रमांकाच्या कारने दारूची वाहतूक होत असल्याचे महिलांच्या लक्षात आले. त्यांनी अन्य महिलांना जागे करून तत्काळ वाहनाला व वाहन चालकाला पकडले व मेहकर पोलीस स्टेशनला माहिती दिली. त्यानंतर ठाणेदार मोतीचंद राठोड, प्रभाकर सानप, गजानन सानप, सचिन सोळंके, प्रवीण साबळे आदी तातडीने घटनास्थळी पोहचले व मुद्देमालासह चालकाला ताब्यात घेतले.यावेळी सुभाबाई गुलाब कुसळकर, शशीकला लक्ष्मण कुसळकर, रेणुका मुकिंदा धंदर, रामकोर ज्ञानेश्वर ऐताळकर, वंदना मनोहर म्हस्के, रामकोर कोंडू केवट, गोदावरी भगवान दिनकर, शेवंताबाई विठ्ठल धंदर, गंगुबाई रामराव धंदर, कलाबाई तुकाराम कुसळकर, सुनीता आत्माराम धंदर, सुनीता संजय धंदर, सत्यभामा सुखदेव म्हस्के, कमल उकंडा काळे, तंटामुक्ती अध्यक्ष गजानन पागोरे, पोलीस पाटील सुनील गिरी, मनोहर शंकर म्हस्के, प्रमोद म्हस्के, सदाशिव म्हस्के, योगेश नवघरे, आकाश जाधव आदींची उपस्थिती होती.
ब्रह्मपुरीच्या रणरागिणींनी पकडली दारू!
By admin | Published: July 08, 2017 1:11 AM