बुलडाणा : गतवर्षीपासून काेराेनाचे संकट आल्याने अनेकजण आर्थिक संकटात सापडले आहेत़ जगभरात काेराेना महामारीचे भीषण संकट असतानाही विविध विभागांत लाचखाेरी सुरू असल्याचे चित्र आकडेवारीवरून समाेर आले आहे़ बुलडाणा जिल्ह्यात २०२० या वर्षात लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने १४ सापळे यशस्वी केले आहेत़, तर २०२१ या वर्षातील पाच महिन्यांत ९ लाचखोरांना गजाआड करण्यात आले आहे. यामध्ये महसूल, महाराष्ट्र राज्य वीज वितरण कंपन्या आणि इतर विभागाचे अधिकारी कर्मचारी यांचा समावेश आहे. लाचखाेरीत महसूल सर्वांत पुढे असल्याचे आकडेवारीवरून दिसते़
शासकीय कार्यालयात काम अडल्यानंतर, तसेच शासकीय कंत्राटदार व इतरांची बिले काढण्यासाठी प्रत्येक टेबलवर लाच मागितली जाते. त्यामुळे अशा लाचखोरांवर कारवाई करण्यासाठी बुलडाणा लाचलुचपत प्रतिबंधक विभाग कार्यरत आहेत. एक वर्षापासून कोरोनाचे संकट असल्यामुळे शासकीय कार्यालयातील कामकाज कमी प्रमाणात सुरू आहे, तर अनेकांची कामे अडलेली आहेत. त्यामुळे ही कामे करण्यासाठी लाच मागणाऱ्या ९ जणांवर २०२१ या वर्षात बुलडाणा लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने कारवाई केली आहे़
कोणत्या वर्षात किती कारवाया
२०१८ - २०
२०१९ -१७
२०२० - १४
२०२१ - ०८
कोरोनाकाळात महसूलची वरकमाई जोरात
विभागनिहाय कारवाई
महसूल ०७
पोलीस ०६
वनविभाग ०१
वीज वितरण कंपन्या ०१
जि प़ ०४
वित्त विभाग ०१
कृषी विभाग ०१
खासगी ०१
खामगाव, सिंदखेडराजा तालुक्यात सर्वाधिक कारवाई
लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने २०२१ मध्ये पाच महिन्यांतच ८ सापळे यशस्वी केले आहेत़ यामध्ये ९ जणांवर कारवाई करण्यात आली आहे़ खामगाव आणि सिंदखेडराजा तालुक्यात सर्वाधिक दाेन कारवाया करण्यात आल्या आहेतल, तर लयाेणार, चिखली, शेगाव, देउळगावराजा येथे प्रत्येकी एक कारवाई करण्यात आली आहे़
काेराेनाकाळातही लाचखाेरी सुरूच आहे़ एसीबीकडे तक्रार आल्यानंतर त्यावर लगेच कारवाई करण्यात येते़ लाेकसेवकाने लाच मागितल्यास तक्रार करावी़ यावर्षी आतापर्यंत ८ सापळे यशस्वी करण्यात आले आहे, तसेच ९ जणांवर कारवाई करण्यात आली आहे़
संजय चाैधरी, उपअधीक्षक
लाचलुचपत प्रतिबंधक विभाग, अकोला.