शहरं
Join us  
Trending Stories
1
शिंदेंनी बंडखोरी केली नसती तर भाजपा सत्तेत आली नसती; महायुतीच्या जुन्या सहकाऱ्याचे वक्तव्य
2
“मी मोदींना फोन केला, म्हटलं माझा कुठलाही अडसर नसेल!”; एकनाथ शिंदेंनी CM पदावरचा दावा सोडला
3
“नापी है मुठ्ठी भर जमीन, अभी सारा आसमान बाकी है”; एकनाथ शिंदेंनी शायरीतून सांगितला 'फ्युचर प्लॅन'
4
“देवेंद्र फडणवीसांना मुख्यमंत्री म्हणून एकनाथ शिंदेंचा पाठिंबा आहे का?”; भाजपाने केले स्पष्ट
5
Maharashtra Politics : मोदी-शाह म्हणतील तसं! जो मुख्यमंत्री ठरवाल, त्याला आमचा पाठिंबा; एकनाथ शिंदेंनी जाहीरच करून टाकलं
6
"...अन्यथा तुम्हाला सरकारी नोकरी गमवावी लागेल", मुख्यमंत्र्यांनी घेतला मोठा निर्णय
7
'लव्ह अँड वॉर'च्या सेटवरुन Photos लीक, रेट्रो लूकमध्ये दिसली आलिया तर रणबीरचा डॅशिंग अवतार
8
Baba Siddique : "मारेकऱ्यांच्या खात्यावर पैसे पाठवण्यासाठी मिळाले ५० हजार"; आरोपीने दिली महत्त्वाची माहिती
9
शिंदे उद्या दिल्लीला जाणार! भाजपच्या वरिष्ठ नेत्यांसोबत देवेंद्र फडणवीस, अजित पवारांचीही बैठक होणार
10
"सगळ्या पदांपेक्षा लाडका भाऊ ही ओळख मोठी"; एकनाथ शिंदेंचं CM पदाबाबत सूचक विधान
11
"नाराज होऊन आम्ही रडणारे नाही", एकनाथ शिंदेंकडून मुख्यमंत्रीपदावरील दावा सोडण्याचे संकेत 
12
एकनाथ शिंदेंनंतर लगेचच भाजपही पत्रकार परिषद घेणार; काय घडतेय...
13
अमित शाह यांच्या दालनात शिवसेनेच्या खासदारांना जमण्याच्या सूचना; श्रीकांत शिंदे अनुपस्थित राहणार?
14
मुख्यमंत्रिपदाची शर्यत! अजित पवार निघाले शरद पवारांनीच मळलेल्या वाटेवर; दिल्लीत गाठीभेटी
15
Defence Stock: डिफेन्स स्टॉक्स पुन्हा एकदा सुस्साट, एक्सपर्ट बुलिश; पाहा काय आहेत नवी टार्गेट प्राईज
16
सत्तेत असावे की, सत्तेबाहेर? बच्चू कडूंनी जनतेलाच विचारला सवाल
17
ICC Test Rankings: जसप्रीत बुमराह पुन्हा 'नंबर १'! यशस्वी जैस्वाल, विराट कोहलीचीही कसोटी यादीत मोठी झेप
18
शेजाऱ्याने मुलाला केलं किडनॅप, नंतर शोधण्याचं नाटक; खंडणी न मिळताच भयंकर कृत्य अन्...
19
विरोधकांना EVMवर संशय, कोर्टात जायची तयारी; भाजपा नेतृत्वाचे भाष्य, म्हणाले, “लोकसभेवेळी...”
20
भाजपच्या मंत्र्यानं अजान ऐकून थांबवलं भाषण; मंचावरूनच पठण केलं, ‘ला इलाहा इल्लल्लाह…’ 

पेट्रोल-डिझेलच्या दराने बजेट कोलमडले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 07, 2021 4:42 AM

बुलडाणा : पेट्रोल-डिझेलच्या दरवाढीने सर्वसामान्यांचे बजेट कोलमडले आहे. किराणा व भाजीपाल्यासह सर्वच जीवनावश्यक वस्तूंचे दर वाढले आहेत. त्यामुळे ग्राहकांना ...

बुलडाणा : पेट्रोल-डिझेलच्या दरवाढीने सर्वसामान्यांचे बजेट कोलमडले आहे. किराणा व भाजीपाल्यासह सर्वच जीवनावश्यक वस्तूंचे दर वाढले आहेत. त्यामुळे ग्राहकांना खूप मोठा आर्थिक फटका बसत आहे. कोरोनामुळे आधीच अडचणीत असलेल्यांसमोर आता भाववाढीचे संकट उभे ठाकले असल्याचे दिसून येत आहे.

वर्षभरात पेट्रोल आणि डिझेलच्या दरात जवळपास ३० रुपयांची वाढ झाली आहे. त्याचा परिणाम मालवाहतुकीवर झाल्याने जीवनावश्यक वस्तूंच्या किमती मोठ्या प्रमाणात वधारल्या आहेत. एकंदरीत महागाईचा भडका उडाला आहे. किराणा वस्तूंसह भाजीपाल्याच्या किमतीही आकाशाला भिडल्या आहेत. आता सर्वच भाज्यांचे दर ५० रुपये किलोवर पोहोचले आहेत. त्यामुळे पूर्वीच्या तुलनेत ५०० रुपयांच्या भाज्या एका थैलीत येत आहेत. किराणा वस्तू आणि भाजीपाल्याचे भाव ऐकून गरीब व सामान्यांना घाम फुटत असल्याची परिस्थिती आहे. त्यातच तूरडाळींसह अन्य डाळींचेही भाव वाढले आहेत. खाद्यतेलात अतोनात वाढ झाली आहे. दररोज मजुरी कमावून स्वयंपाकघरातील वस्तू खरेदी करताना गरिबांच्या नाकीनऊ येत आहेत.

एकंदरीतच पेट्रोल-डिझेलच्या दराने किचन कोलमडले असून किराणा आणि भाजीपाला महागला आहे. कोरोनाकाळात अनेकांचा रोजगार गेल्याने त्यांचे उत्पन्नाचे साधन बंद झाले आहे. दोनवेळच्या जेवणाचा प्रश्न त्यांच्यासमोर उभा राहिला आहे. महागाईने कहर केल्याने कुटुंबीयांचा दैनंदिन खर्च कसा पूर्ण करायचा, हे संकट त्यांच्यासमोर उभे राहिले आहे. महागाईवर नियंत्रण आणण्यात केंद्र आणि राज्य शासनही पुढाकार घेत नसल्याचा त्यांचा आरोप आहे. महागाईवर नियंत्रण आणण्यासाठी अनेक ग्राहक संघटनांनी शासनाला निवेदने दिली आहेत. शासन महागाई कमी करण्यासाठी काहीच पावले उचलत नाही, असा ग्राहक संघटनांचा आरोप आहे.

...........प्रतिक्रिया............

व्यापाऱ्यांची प्रतिक्रिया

गेल्या दोन महिन्यांत किराणा वस्तूंचे दर महाग झाले आहेत. त्याची झळ गरीब व सर्वसामान्यांना बसत आहे. ही बाब सत्य आहे. ग्राहकांचा किरकोळ विक्रेत्यांवर रोष असतो, पण आमचा नाईलाज आहे. ठोक व्यापाऱ्यांकडून खरेदी केलेला माल थोडा नफा कमावून विक्री करतो. नियंत्रणासाठी शासनाने पुढाकार घ्यावा.

-मोहन इंगळे, किराणा व्यापारी.

गेल्या पंधरा दिवसांपासून भाज्यांची आवक कमी असल्याने भाववाढ झाली आहे. भाववाढीने ग्राहक त्रस्त आहे. नवीन उत्पादन बाजारात येईस्तोवर ग्राहकांना पुढील दोन महिने भाज्या जास्त भावातच खरेदी कराव्या लागतील. दरवर्षी या काळात भाज्या महागच असतात, असा अनुभव आहे.

-प्रल्हाद इंगळे, भाजीपाला विक्रेते.

...............बॉक्स....................

डाळ आटोक्यात, तेल महाग

सरकारने आयात खुली केल्याने महिन्यापासून सर्वच डाळींच्या किमतीत घसरण झाली आहे. तूरडाळ दर्जानुसार ९० ते १०५, चना डाळ ६० ते ६५ आणि उडद, मसूर डाळींच्या किमतीत घट झाली आहे. एक महिन्यात खाद्यतेलाच्या किमतीत घसरण झाली असली तरीही नोव्हेंबर-२० च्या तुलनेत भाव जास्तच आहे. नोव्हेंबरमध्ये ९५ रुपये किलो असलेले सोयाबीन तेलाचे दर १५५ रुपयांवर आहेत शिवाय शेंगदाणा १६८, पामोलिन १५५, जवस २७०, एरंडी १३५, राईस ब्रान १३८, मोहरी १५५, सूर्यफूल १७० रुपये भाव आहेत.

.............प्रतिक्रीया.................

किराणा वस्तू, खाद्यतेल, भाजीपाल्यासह स्वयंपाकघरातील सर्वच वस्तू महाग झाल्याने महिन्याचे बजेट कोसळले आहे. पेट्रोल आणि डिझेलच्या किमतीसह या महिन्यात सिलिंडरचेही दर वाढले आहेत. कोरोनामुळे उत्पन्न कमी झाले तर त्या तुलनेत खर्च वाढला आहे. भाज्यांच्या किमती वाढल्याने कडधान्यावर भर द्यावा लागत आहे. महागाईवर नियंत्रण आणण्यासाठी शासनाने कठोर उपाययोजना कराव्यात.

- समीक्षा जोशी, गृहिणी.

....................प्रतिक्रिया..............

स्वयंपाकघरातील आवश्यक वस्तूंच्या किमती कमी करण्याची महिलांची शासनाकडे मागणी आहे. पण शासन मूग गिळून बसले आहे. पेट्रोल, डिझेल, खाद्यतेल, डाळी, धान्य, किराणा वस्तूंचे भाव आकाशाला भिडले आहेत. वाढलेले भाव कमी होण्याची आता शक्यता नाही. दुसरीकडे कोरोनामुळे उत्पन्न कमी झाले आहे. मुलांचा शिक्षणाचा खर्च वाढला आहे. महागाईला कसे तोंड द्यायचे, हा गंभीर प्रश्न गृहिणींसमोर आहे.

- स्मिता गवई, गृहिणी.

.............बॉक्स.............

ट्रॅक्टरची शेतीही महागली

पेट्रोलप्रमाणे डिझेलची शंभरीकडे वाटचाल सुरू असून, वर्षभरात जवळपास प्रतिलिटर ३० रुपयांनी वाढले आहे. त्यामुळे यंदाच्या हंगामात ट्रॅक्टरची शेतीही महागली आहे. ट्रॅक्टरचा ॲव्हरेज कमी असल्याने शेतीच्या झटपट मशागतीसाठी शेतकऱ्यांना ट्रॅक्टरही परवडत नाही. डिझेलच्या भडक्यामुळे आता शेतकऱ्यांना ट्रॅक्टर चालविणे कठीण झाले आहे. त्यांना पुन्हा बैलजोडीची आठवण येत आहे. सामान्य शेतकरी ट्रॅक्टरच्या मशागतीला नकार देत आहेत.

................बॉक्स...............

असे वाढले पेट्रोल-डिझेलचे दर

जानेवारी २०१८ ७९.५४ ६७.८२

जानेवारी २०१९ ७५.१० ६६.१५

जानेवारी २०२० ८१.२७ ७१.८४

जानेवारी २०२१ ९०.५५ ७९.५५

फेब्रुवारी ९३.६८ ८८.२०

मार्च ९७.३७ ८७.०९

एप्रिल ९६.६३ ८६.३२

मे ९६.८० ८६.५३

जून १००.३३ ९१.१६

जुलै १०५.४१ ९५.२८

...........बॉक्स...............

भाजीपाल्याचे दर

टमाटा : ३०

शेवगा : ८०

कोथिंबीर : ८०

चवळी शेंग : ५०

मेथी : ८०

............बॉक्स...........

फूलकोबी ६० रुपये किलो

भाज्यांच्या किमती मोठ्या प्रमाणात वाढल्या असून, महिन्यापूर्वी किरकोळमध्ये ३० रुपये किलो असलेले फूलकोबीचे भाव ६० रुपयांवर गेले आहेत. सध्या शेतकऱ्यांनी खरीप हंगामावर लक्ष्य केंद्रीत करून भाज्यांकडे दुर्लक्ष केले आहे. परिणामी भाज्या वधारल्या आहेत. सध्या ठोक बाजारात आवक कमी झाली आहे. गृहिणींना आणखी दोन महिने महाग भाज्या खरेदी कराव्या लागतील.