लोकमत न्यूज नेटवर्कधाड: बाजारापेक्षा जादा दर देण्याचा करारावरून शेतकर्यांकडून सोयाबीन खरेदी करत १३ शेतकर्यांची १६ लाख ६८ हजारांची रक्कम न देता पोबारा करणार्या मासरूळ (ता. बुलडाणा) येथील एका युवकासह त्याचा भाऊ आणि मामाविरोधात धाड पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. एकास जालना जिल्हय़ातील भोकरदन तालुक्यातील दगडवाडी येथून अटक करण्यात पोलिसांना यश आले आहे. दरम्यान, बुलडाणा न्यायालयाने त्यास १५ फेब्रुवारीपर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे. या प्रकरणात धाड पोलिसांनी ३१ जानेवारी रोजी गुन्हा दाखल करून पोलिसांनी तपास सुरू केला होता. तशी शेतकर्यांनी तक्रार नोंदवली होती. यातील मुख्य आरोपीचा मामा पोलिसांच्या ताब्यात आला असल्याने आता शेतकर्यांना त्यांचे पैसे मिळण्याचा मार्ग मोकळा झाला आहे.बुलडाणा तालुक्यातील ग्राम मासरूळ येथील शेतकरी वैजीनाथ हरिभाऊ विसपुते यांनी ३१ जानेवारी २0१८ रोजी धाड पोलिसात तक्रार दिली होती. मासरूळमधील आरोपी कैलास ज्ञानदेव गाढवे, त्र्यंबक ज्ञानदेव गाढवे व त्यांचा मामा कृष्णा दामोधर चेके यांनी जवळपास वेगवेगळ्या गावातून वेगवेगळ्या तारखेस ५५६ क्विंटल ६0 किलो सोयाबीन खरेदी केले होते. १६ लाख ६८ हजार ५0५ रुपयांचे हे सोयाबीन होते. करारावर पैसे देण्याचेही त्यांनी कबूल केले होते; मात्र वेळेत पैसे न देता संबंधितांनी पोबारा केला होता. या प्रकरणात नंतर पोलिसांत १२ जणांनी तक्रारी दाखल केल्या होत्या. यातील आरोपी कृष्णा दामोधर चेके यास भोकरदन तालुक्यातील दगडवाडी येथून पोलिसांनी अटक केली आहे. यातील मुख्य आरोपी कैलास गाढवे व त्याचा भाऊ त्र्यंबक गाढवे हे दोघे अद्यापही फरार आहेत. त्यांचा शोध पोलीस घेत आहेत. दरम्यान, कृष्णाची केस न्यायालयासमोर हजर केली असता १५ फेब्रुवारीपर्यंत त्यास पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे. या प्रकरणी अधिक तपास ठाणेदार संग्राम पाटील, पोलीस हेड कॉन्स्टेबल ओमप्रकाश साळवे, प्रकाश दराडे, सुभाष मान्टे, गजानन मोरे, दशरथ शितोळे हे करीत आहेत.
बुलडाणा : सोयाबीन खरेदीत १३ शेतकर्यांची फसवणूक!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 12, 2018 1:26 AM
धाड: बाजारापेक्षा जादा दर देण्याचा करारावरून शेतकर्यांकडून सोयाबीन खरेदी करत १३ शेतकर्यांची १६ लाख ६८ हजारांची रक्कम न देता पोबारा करणार्या मासरूळ (ता. बुलडाणा) येथील एका युवकासह त्याचा भाऊ आणि मामाविरोधात धाड पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. एकास जालना जिल्हय़ातील भोकरदन तालुक्यातील दगडवाडी येथून अटक करण्यात पोलिसांना यश आले आहे.
ठळक मुद्दे१६ लाखांचा माल घेऊन व्यापारी फरार!