शहरं
Join us  
Trending Stories
1
“सुप्रीम कोर्टाने काय करावे, हे आता एक पक्ष सांगणार का?”; चंद्रचूड यांनी ठाकरे गटाला फटकारले
2
'मी नेहमी संविधानाच्या मर्यादेचा आदर केला...', संविधान दिनानिमित्त पंतप्रधान मोदींचे भाष्य
3
“अशा निवडणुका पाकिस्तान, अफगाणिस्तानात होत नसतील, आयोग जिवंत आहे का”; संजय राऊत संतापले
4
मनोज जरांगेंचे ठरले; सरकार स्थापन झाल्यावर तारीख जाहीर करणार, पुन्हा बेमुदत उपोषणाला बसणार
5
पाकिस्तानात तख्तापालट होण्याचे संकेत? इम्रान खान यांच्या समर्थकांसोबत सैन्य; हस्तांदोलन, मिठ्या मारल्या 
6
"दहशतवादी संघटनांना चोख प्रत्युत्तर देणार"; २६/११च्या हल्ल्याच्या वर्षपूर्तीनिमित्त पंतप्रधान मोदींचे आश्वासन
7
झुनझुनवाला यांनी 10 मिनिटांत कमावले ₹105 कोटी; 'या' दोन शेअर्समुळे लागली लॉटरी; पडला पैशांचा पाऊस!
8
"अजित पवारांनी सरेंडर होऊन आमची..."; रामदास कदमांचे मोठं विधान, म्हणाले, "काहीही केलं तरी..."
9
नाना पटोलेंनी दिल्ली गाठली, मल्लिकार्जून खरगे-राहुल गांधींची भेट घेतली; नेमके काय घडले?
10
BLOG: अमित ठाकरे निवडणुकीच्या चक्रव्यूहात शिरले खरे, पण...; 'राजपुत्रा'चं नेमकं काय चुकलं? सहा प्रमुख मुद्दे
11
...म्हणून मुख्यमंत्रिपदाचा उमेदवार जाहीर करण्यास विलंब; भाजपचे 'या' कामाला प्राधान्य
12
आधारवाडीतील इमारतीच्या पंधराव्या मजल्यावर भीषण आग; अग्निशमन दलाचे वाहन बिघडले
13
राहुल गांधींचे नागरिकत्व रद्द होणार का? केंद्र सरकार १९ डिसेंबरला उच्च न्यायालयाला निर्णय कळविणार
14
Numerology: ‘या’ ६ मूलांक होतील मालामाल, धनलाभाचे योग; नोव्हेंबरची सांगता होईल खास!
15
"हिंदूंच्या हक्कांसंदर्भात बोलणारे निर्लज्ज, ...या सरकारला भारतातील अल्पसंख्यकांची चिंता नाही"; काय म्हणाले ओवेसी?
16
तिसऱ्या महायुद्धात अण्वस्त्रांचा वापर, एक तृतीयांश लोकसंख्या मारली जाणार; सिडनीच्या बिशपची भविष्यवाणी 
17
"हे फक्त शब्द नाहीत, इशारा आहे"; चिमुकलीवरील अत्याचाराच्या घटनेनंतर अमित ठाकरे संतापले
18
TV, OTT, AI सगळं एकाच ठिकाणी; टीव्हीसोबतच मिळणार सगळ्याचं 'सबस्क्रिप्शन'
19
महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीतील महायुतीच्या विजयानंतर, काँग्रेसची मोठी घोषणा; देशभरात खास मोहीम चालवणार 
20
"तुम्ही जिंकता तेव्हा ईव्हीएम चांगले अन् पराभूत झाले, तर..."; सुप्रीम कोर्टाने पिळले कान

बुलडाणा : कोटा येथून २९ विद्यार्थी परतले;  दीड महिन्यापासून होते अडकून

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 03, 2020 10:44 AM

मुलांना समोर पाहताच पालकांच्या डोळ्यात आनंदाश्रू तरळले व त्यांनी सुटकेचा नि:श्वास सोडत प्रशासनाचे आभार मानले.

- योगेश देऊळकार लोकमत न्यूज नेटवर्कबुलडाणा : ‘लॉकडाउन’मुळे राजस्थानमधील कोटा येथे गेल्या दीड महिन्यापासून अडकलेले जिल्ह्यातील विद्यार्थी घरी येण्याची आस्थेने वाट पाहत होते. अखेर त्यांची प्रतीक्षा संपली अन् शुक्रवारी २९ विद्यार्थ्यांना प्रशासनाने एसटी बसद्वारे घरपोच सोडले. मुलांना समोर पाहताच पालकांच्या डोळ्यात आनंदाश्रू तरळले व त्यांनी सुटकेचा नि:श्वास सोडत प्रशासनाचे आभार मानले.शिक्षणानिमित्त राजस्थानमधील कोटा येथे गेलेले महाराष्ट्रातील १ हजार ७६४विद्यार्थी ‘लॉकडाउन’मुळे अडकून पडले होते. यामध्ये बुलडाणा जिल्ह्यातील २९ विद्यार्थ्यांचा समावेश होता. पालकांकडून या विद्यार्थ्यांना परत आणण्याची मागणी स्थानिक प्रशासनाकडे करण्यात येत होती. पालकांच्या मागणीनंतरही प्रशासनाकडून त्यांना परत आणण्याबाबत कोणत्याही प्रकारची कार्यवाही करण्यात आली नव्हती. विद्यार्थ्यांची माहिती शासनाकडे सादर करण्यात आल्याचे सांगण्यात येत होते. अखेर यासंदर्भात २९ एप्रिल रोजी वरीष्ठ पातळीवरून निर्णय होऊन विद्यार्थ्यांना राज्य परिवहन महामंडळाच्या बसेसमधून परत आणले जाणार असल्याचे स्पष्ट करण्यात आले होते. अमरावती विभागातील १९० विद्यार्थ्यांसाठी धुळे जिल्ह्यातील शिंदखेडा आगारातून १० बसेसची व्यवस्था करण्यात आली होती. यामध्ये अकोला, अमरावती जिल्ह्यासाठी चार व बुलडाणा, यवतमाळ, वाशिम जिल्ह्याकरीता सहा बसेस सोडण्यात आल्या होत्या. बुलडाणा जिल्ह्यातील २९ विद्यार्थ्यांना दोन बस (क्रमांक एम-एच- २० -बीएल - ३०३१ व एम-एच-१४ - बीएल - ४०४९) च्या माध्यमातून सोडण्यात आले. विद्यार्थी १ मे रोजी घरी पोहचले. मुलांना समोर पाहताच पालकांना गहिवरून आले.

तपासणी करून ‘होम क्वारंटीन’चा सल्लाकोटा येथे अडकलेल्या विद्यार्थ्यांना एसटी बसच्या माध्यमातून सर्वप्रथम खामगाव येथील उपजिल्हा रुग्णालयात सोडण्यात आले. याठिकाणी त्यांची वैद्यकीय तपासणी करण्यात आली. सर्व विद्यार्थी निरोगी असल्याचे स्पष्ट झाल्यानंतर त्यांना पालकांच्या स्वाधीन करण्यात आले व १४ दिवस ‘होम क्वारंटीन’ठेवण्याचा सल्ला देण्यात आला. यानंतर सर्व विद्यार्थी खासगी वाहनाने आपल्या मूळगावी पोहचले.

टॅग्स :buldhanaबुलडाणाStudentविद्यार्थी