लोकमत न्यूज नेटवर्क बुलडाणा : जिल्ह्यात कोरोनामुळे ५ जणांचा मृत्यू झाला असून ७७३ जण तपासणीत पॉझिटिव्ह आढळून आले. दरम्यान, रविवारी प्रयोगशाळेत तपासणीसाठी पाठविलेल्या व रॅपिड ॲन्टिजन टेस्ट किटद्वारे तपासलेल्या अहवालांपैकी एकूण ४,६८९ अहवाल प्राप्त झाले आहेत. यापैकी ३,९१६ जणांचे अहवाल निगेटिव्ह आले आहेत.पॉझिटिव्ह आलेल्या अहवालामध्ये बुलडाणा तालुक्यातील ६३, खामगाव तालुक्यातील ५६, शेगाव तालुक्यातील २६, देऊळगावराजामधील ७०, चिखली ११९, मेहकर ५९, मलकापूर २८, नांदुरा २१८, लोणार ६५, मोताळा १६, जळगाव जामोद १५, सिंदखेडराजा ३० आणि संग्रामपूर तालुक्यातील ८ जणांचा यामध्ये समावेश आहे. दरम्यान, अकोला जिल्ह्यातील पारस येथील २८ वर्षीय व्यक्ती, सिंदखेडराजा तालुक्यातील सायाळा येथील ६५ वर्षीय पुरुष, बुलडाणा तालुक्यातील मासरूळ येथील ५५ वर्षीय पुरुष, बुलडाण्यातील जिजामाता नगरमधील ७२ वर्षीय महिला आणि नांदुरा तालुक्यातील सोनज येथील ७० वर्षीय महिलेचा कोरोनामुळे मृत्यू झाला. रविवारी एकूण ५ जणांचा कोरोनामुळे जिल्ह्यात मृत्यू झाला आहे.दुसरीकडे ९७३ जणांनी कोरोनावर मात केल्यामुळे त्यांना रुग्णालयातून सुटी देण्यात आली. आजपर्यंत तपासणी करण्यात आलेल्या ३ लाख ८७ हजार २०३ संदिग्धांचे अहवाल तपासणीमध्ये निगेटिव्ह आले आहेत तर ६६ हजार २१४ बाधितांनी कोरोनावर मात केल्यामुळे त्यांना रुग्णालयातून सुटी देण्यात आली आहे.
बुलडाणा : कोरोनामुळे ५ जणांचा मृत्यू; ७७३ जण पॉझिटिव्ह
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 10, 2021 10:04 AM