लोकमत न्यूज नेटवर्कबुलडाणा : जिल्ह्यात कोरोनाचा संसर्ग वाढतच असून २४ आॅगस्ट रोजी आणखी ५५ रुग्णांचा अहवाल पॉझिटीव्ह आल आहे. त्यामुळे, जिल्ह्यातील बाधीतांची संख्या २६३५ वर पोहचली आहे. ९२ जणांनी कोरोनावर मात केल्याने त्यांना रुग्णालयातून सुटी देण्यात आली असून ८१० रुग्णांवर उपचार सुरू आहेत. आतापर्यंत कोरोनामुळे ४२ जणांचा मृत्यू झाला आहे. १ हजार ७८३ रुग्णांनी आतापर्यंत कारोनावर मात केली आहे.पॉझीटीव्ह रुग्णांमध्ये बुलडाणा शहरातील चार , परदेशीपुरा येथील एक, वार्ड क्रमांक दोनमधील दोन, पैनगंगा अपार्टमेंट आठ, हाजी मलंग दर्गाजवळ एक, धाड ता. बुलडाणा येथील एक, नांदुरा येथील दोन, संकल्प कॉलनी येथील चार , सिनेमा रोड येथील एक, नवाबपूरा एक, कृष्णा नगर एक, रसलपुर ता. नांदुरा येथील एक, शेगांव येथील गजानन सोसायटीतील एक, जुना चिंचोली रोड येथील एक, जळगांव जामोद येथील एक, दुधलगांव ता. मलकापूर येथील तीन , तपोवन ता. मोताळा येथील १३ , धा.बढे ता. मोताळा येथील एक, बोराखेडी ता. मोताळा येथील एक , चिखली येथील तीन, मूळ पत्ता पातोंडा जि. अकोला येथील एक , आलेगांव ता. पातूर जि. अकोला येथील एक, अकोलखेड ता. अकोट जि. अकोला येथील एक, वाकी जि. अकोला येथील एका रुग्णाचा समावेश आहे. आज ९५ रूग्णांनी कोरोनावर मात केल्यामुळे त्यांना वैद्यकीय प्रोटोकॉलप्रमाणे सुट्टी देण्यात आली आहे. जिल्ह्यातील ११६२ नमुने अहवालाच्या प्रतीक्षेत आहेत.