या निवडणुकांमध्ये भारतीय जनता पार्टीला घवघवीत यश मिळाले व प्रमुख विरोधी पक्ष म्हणून भाजपला मान्यता मिळाली. भारतीय जनता पार्टीने लोकशाही मार्गाने जनतेचा विश्वास संपादन करून पं. बंगाल राज्यात आपले अस्तित्व तयार केले आहे. त्यामुळे तृणमूल काँग्रेसकडून भाजपा कार्यालयाची तोडफोड व पदाधिकारी व कार्यकर्त्यांना मारहाण झाली आहे. या घटनेचा बुलडाण्यात भाजपच्यावतीने निषेध व्यक्त करण्यात आला तसेच तृणमूल काँग्रेसच्या ह्या हल्ल्यात गेल्या काही वर्षांपासून हिंसाचारात बळी पडलेल्या भाजप कार्यकर्त्यांना श्रद्धांजली अर्पण करण्यात आली. यावेळी जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन देण्यात आले. निवेदन देतेवेळी किसान मोर्चाचे प्रदेश सचिव दीपक वारे, महिला मोर्चा जिल्हाध्यक्ष सिंधुताई खेडेकर, जिल्हा सरचिटणीस अल्काताई पाठक, महिला तालुकाध्यक्ष मायाताई पद्ममने, तालुका सरचिटणीस अर्जुन दांडगे, नगरसेवक अरविंद होंडे, वैभव इंगले, मंदार बाहेकर, कुलदीप पवार, यतिन पाठक आदींची उपस्थिती होती.
भाजपच्यावतीने बुलडाण्यात आंदोलन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 06, 2021 4:36 AM