लोकमत न्यूज नेटवर्कचिखली (बुलडाणा ): ऐन हंगामात कोणत्याही पूर्व सूचना न देता महावितरणने शेतकर्यांचा विज पुरवठा खंडीत केल्याने २६ डिसेंबर रोजी संतप्त शेतकर्यांनी आमदार राहुल बोंद्रे यांच्या नेतृत्वात केळवद येथील महावितरणचे कार्यालयाची होळी केली. दरम्यान हे आंदोलन अधिक चिघळण्याची शक्यता पाहता विद्युत वितरणने तातडीने शेतकर्यांचा विद्युत पुरवठा सुरळीत केला.
महावितरणच्या केळवद कार्यालयाअंतर्गत असलेल्या केळवद, शिरपूर, किन्होळा, वाडी ब्रम्हपुरी, गिरोला, हातणी या गावातील शेतकर्यांच्या विद्युत पुरवठा महावितरणने कोणतीही पूर्वसुचना न देता पाच दिवसांपासून खंडीत केला होता. यामुळे या गावातील ऐन भरात आलेले गहु, हरभरा, तूर, मका, कांदा व भाजीपाल्याची पिके धोक्यात आली होती. तर उपरोक्त गावातील अनेक शेतकर्यांनी विजबील भरले असून काहींना बिले देखील मिळालेली नाहीत. असे असताना महावितरणने अचानकपणे सरसकट कृषीपंपाचा विज पुरवठा खंडीत केल्याने उपरोक्त गावातील शेतकर्यांनी आ.राहुल बोंद्रे यांच्या नेतृत्वात केळवद येथील कार्यालयावर धडक दिली असता तेथे कोणताही अधिकारी वा कर्मचारी उपस्थित नव्हते. दरम्यान उशीराने येथे बुलडाणा येथून कार्यकारी अभियंता रामटेके उपस्थित झाले खरे मात्र, त्यांच्याकडूनही शेतकर्यांना दिलासा न मिळाल्याने शेतकर्यांनी संतापाच्या भरात केळवद येथील कार्यालयास आग लावली. दरम्यान आ.बोंद्रे यांनी जोपयर्ंत शेतकर्यांचा विजपुरवठा सुरळीत होत नाही तोपयर्ंत एकाही अधिकारी कर्मचार्याला येथून हलू देणार नाही, अशी आक्रमक भूमिका घेतल्याने कार्यकारी अभियंता रामटेके यांच्या सूचनेवरून खंडीत विजपुरवठा सुरळीत करण्यात आला.
यावेळी आ.बोंद्रे यांच्यासह संजय पांढरे, प.स.सदस्य प्रभाकर वाघ, धाड सरपंच रीझवान सौदागर, रमेश सुरडकर, सरपंच निंबाजी सवडे, संजय गिरी, पिंटू गायकवाड, बाळु साळोख, राम जाधव, समाधान शेळके, नामदेव सदार, दिपक जाधव, दिलीप सुसर, अरूण शेळके, अशोक वानखेडे, संजय बाहेकर, भगवान राजपूत, शे.अन्सार, गणेश पांढरे, अशोक पाटील, सुनिल पाटील, समाधान पाटील, अमोल कालेकर, सुभाष भोसले, नंदु बोरबळे, भगवान पांढरे, श्रीकृष्ण पाटील, समाधान हाडे यांच्यासह केळवद, शिरपूर, किन्होळा, वाडी ब्रम्हपुरी, गिरोला, कोलारी, हातणी आदी गावातील बहुसंख्य शेतकरी उपस्थित होते.