लोकमत न्यूज नेटवर्कबुलडाणा : शेतकरी कर्जमाफीमुळे पीक कर्ज वाटपाचे उदिष्ठ वाढलेल्या बुलडाणा जिल्ह्यात पीक कर्ज वाटपाचा टक्का अद्यापही निच्चांकी पातळीवर असून तो सुधारण्याची गरज आहे. एकीकडे शेतकऱ्यांना पीक कर्ज वाटप न केल्यास थेट बँक अधिकाऱ्यांवर फौजदारी कारवाई करण्याचा इशारा देण्यात आला असला तरी गत पाच वर्षाचा पीक कर्ज वाटपाचा इतिहास पाहता सातत्याने पीक कर्ज वाटपाचा टक्का घसरत असल्याचे चित्र आहे.त्यामुळे यंदा तीन लाख ६२ हजार ८२८ शेतकºयांना पीक कर्ज वाटपाचे मोठे आव्हान जिल्ह्यातील बँकांसमोर उभे ठाकले आहे. १७ जून पर्यंत जिल्ह्यात दोन हजार ४६० कोटी ३५ लाख रुपयांच्या उदिष्ठापैकी अवघे ४११ कोटी ५५ लाख रुपयांचे पीक कर्ज वाटप झाले आहे. ३० सप्टेंबर खरीप पीक कर्ज वाटपाची अंतिम मुदत असली तरी रेग्युलर पीक कर्ज भरणाºया शेतकºयांठी ३१ आॅगस्ट कर्ज भरण्याची मुदत देण्यात आल्याने खरीपात जिल्ह्यात प्रसंगी शेतकरी मोठ्या संख्येने पीक कर्ज घेण्याची शक्यता आहे. त्यामुळे ३० जून पर्यंत अधिकाधिक कर्ज वाटप करण्याचे आव्हान बँकांसमोर उभे ठाकले आहे.एरवी बुलडाणा जिल्ह्यात पीक कर्जासाठी पात्र असलेल्या शेतकºयांची संख्या ही एक लाख ३० हजार ३०० च्या घरात असते. मात्र शेतकरी कर्जमाफीमुळे यंदा पीक कर्जासाठी पात्र ठरलेल्या शेतकºयांचा टक्का वाढला आहे. त्यामुळे या नव्या शेतकºयांना पीक कर्ज उपलब्ध करणे आवश्यक आहे.जिल्हास्तरावर, तालुका स्तरावर आणि ग्रामस्तरावर पीक कर्ज वाटपाचे कोरोना संसर्गाच्या पार्श्वभूमीवर नियोजन करण्यात आले असले तरी नव्याने कर्ज घेणाºया शेतकºयांना कागदपत्रांची जुळवा जुळव करणे गरजेचे आहे. त्यातच बँकांना मुद्रांक शुल्क ई-चलनाद्वारे घेण्याचे निर्देश दिलेले असतांनाही त्याची प्रभावी अंमलबजावणी होत नसल्याचे चित्र आहे. अशा स्थितीत दोन लाख ३२ हजार ५२८ शेतकºयांना पीक कर्ज कितपत मिळले, असा प्रश्न आहे.वर्तमान स्थितीत एकूण उदिष्ठाच्या अवघ्या १५ टक्के शेतकºयांना अर्थात ५२ हजार ९५२ शेतकºयांना ४११ कोटी ५५ लाख रुपयांचे पीक कर्ज वाटप करण्यात आले आहे. त्यामुळे निर्धारित वेळेत जून अखेर पर्यंत आणखी किती शेतकºयांना पीक कर्ज मिळले, हा प्रश्न कायम आहे. गेल्या पाच वर्षात पीक कर्ज वाटपाचा टक्का हा ८७ टक्क्यांवरून गेल्या वर्षी अवघा २६ टक्क्यांवर आला आहे. जिल्हा बँकेनेचे कर्जवाटप ८९ टक्केजिल्हा केंद्रीय सहकारी बँकेने आतापर्यंत उदिष्ठाच्या ८९ टक्के शेतकºयांना पीक कर्ज वाटप केल आहे. जिल्हा बँकेला १३ हजार १०४ शेतकºयांना ६५ कोटी ५२ हजार रुपयांचे पीक कर्ज वाटपाचे उदिष्ठ होते. त्यापैकी बँकेने आतापर्यंत ११ हजार ६०४ शेतकºयांना पीक कर्ज वाटप केले आहे. एकंदरीत बँकेने ८९ टक्के शेतकºयांना ५१ कोटी ९५ लाख रुपयाचे पीक कर्ज वाटप केले आहे.
सार्वजनिक बँकांनी केले ११ टक्के कर्ज वाटपसार्वजनिक क्षेत्रातील बँकांना दोन लाख ८२ हजार २३० शेतकºयांना पीक कर्ज वाटपाचे उदिष्ठ देण्यात आले आहे. त्यापैकी या बँकांनी आतापर्यंत ३१ हजार ५४९ शेतकºयांना २४४ कोटी सात लाख रुपयांचे पीक कर्ज वाटप केले आहे.खासगी बँकांकडून ५ टक्के शेतकºयांनाच कर्जखासगी बँकांनी आतापर्यंत फक्त पाच टक्के शेतकºयांनाच कर्ज दिले आहे. त्याची रक्कम ४३ कोटी ४७ लाख रुपयांच्या घरात जाते. विदर्भ कोकण बँकेने उदिष्ठाच्या २३ टक्के शेतकºयांना आतापर्यंत कर्ज दिले आहे. त्याची रक्कम ८१ कोटींच्या घरात जाते.