लोकमत न्यूज नेटवर्कबुलडाणा : ज्ञानगंगा अभयारण्यातील अतिसंवेदनशील अशा गोंधनखेड परिसरात १७ जानेवारी रोजी लागलेला वनवा वन कर्मचारी आणि वन्यजीव सोयर्यांच्या सतर्कतेने विझविण्यात आला. सायंकाळी ५.४५ वाजेच्या सुमारास ही घटना घडली होती.काही विघ्नसंतोषी व्यक्तींच्या चुकीमुळे हा वनवा पेटला होता. त्याची माहिती वनरक्षक माधव जंजाल यांनी वन्यजीव सोयरे सदस्यांना दिली व मदतीसाठी लवकर येण्याची हाक दिली. त्याला तत्काळ प्रतिसाद देत वन्यजीव सोयरे आणि वन कर्मचारी घटनास्थळी दाखल झाले व त्यांनी ही आग विझवली. त्यामुळे मोठी हानी टळली. वनवा विझविण्यासाठी वनरक्षक माधव जंजाल, वनरक्षक गवई, महिला वनरक्षक बेलकर यांच्यासह आठ ते दहा कर्मचारी आणि वन्यजीव सोयरे सदस्य नितिन श्रीवास, श्याम राजपूत, अमित श्रीवास्तव, जयंत हिंगे, गणेश श्रीवास्तव, नितिन श्रीवास्तव यांनी पुढाकार घेतला.
बुलडाणा : ज्ञानगंगा अभयारण्यातील आग विझविण्यात यश
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 20, 2018 12:27 AM
बुलडाणा : ज्ञानगंगा अभयारण्यातील अतिसंवेदनशील अशा गोंधनखेड परिसरात १७ जानेवारी रोजी लागलेला वनवा वन कर्मचारी आणि वन्यजीव सोयर्यांच्या सतर्कतेने विझविण्यात आला. सायंकाळी ५.४५ वाजेच्या सुमारास ही घटना घडली होती.
ठळक मुद्देअभयारण्यातील अतिसंवेदनशील गोंधनखेड परिसरात १७ जानेवारी रोजी लागली होती आगवन कर्मचारी आणि वन्यजीव सोयर्यांच्या सतर्कतेने विझला वणवा