शहरं
Join us  
Trending Stories
1
भाजपची मोठी घोषणा! मुंबईत मनसेच्या या उमेदवाराला पाठिंबा; पूर्ण ताकदीने प्रचार करणार
2
लाडक्या बहि‍णींना महिन्याला ₹2100, शेतकऱ्यांना कर्जमाफी अन्..CM शिंदेंच्या 10 मोठ्या घोषणा
3
मुंब्र्यात छत्रपती शिवाजी महाराजांचे मंदिर उभारा; फडणवीसांचं उद्धव ठाकरेंना आव्हान
4
Maharashtra Vidhan Sabha Election 2024: कोल्हापूर उत्तरमधील काँग्रेसचा उमेदवार ठरला; सतेज पाटलांसमोर शाहू महाराजांची घोषणा
5
IPL २०२५ च्या मेगा लिलावाचे शहर ठरले; या तारखांना सौदीत २०४ खेळाडू निवडले जाणार
6
Uddhav Thackeray: शिंदेंना वाटले तर चिन्ह द्या, पण शिवसेना माझीच राहणार; उद्धव ठाकरेंचे मोठे वक्तव्य
7
मावळात राज ठाकरेंनी मोठा निर्णय घेतला; अजित पवार गटाच्या बंडखोर उमेदवाराला पाठिंबा जाहीर
8
गुजरातच्या आणंदमध्ये बुलेट ट्रेनचा पूल कोसळला; दोन मजुरांचा मृत्यू, एक जखमी
9
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : "महायुतीची लाडकी बहीण योजना तात्पुरती, आम्ही योजना कायम ठेवणार"; विश्वजीत कदमांचा विरोधकांवर हल्लाबोल
10
महाराष्ट्रापूर्वी झारखंडमध्ये इंडिया आघाडीचा जाहीरनामा; ७ गॅरंटी, महिलांना पैसे देणार
11
पॅरिस ऑलिम्पिकमध्ये महिला बॉक्सरकडून फसवणूक; गोल्ड जिंकलं पण पुरुष असल्याचे उघड झालं
12
कोल्हापूर उत्तरमधून अपक्ष उमेदवार राजेश लाटकर अर्ज मागे घेणार होते, तितक्यात...
13
महाराष्ट्रात कुठे कोणाची ताकद? मुंबई, विदर्भ, मराठवाड्याचे राजकीय समीकरण काय? पाहा...
14
शाहू महाराज खासदारकीचा राजीनामा देणार? सतेज पाटलांनी अपमान केल्याच्या अफवांवर छत्रपतींचे निवेदन...
15
उत्तर महाराष्ट्रातील ११ मतदारसंघात काट्याची लढत; कुठे कुठे बंडखोरांचं आव्हान?
16
ओडिशात धावत्या ट्रेनवर गोळीबार; प्रवाशांमध्ये प्रचंड घबराट, पाहा व्हिडिओ
17
"...तर हार्ट द्या!"; राष्ट्राध्यक्षपदाच्या निवडणुकीला सुरुवात होताच चर्चेत आली इवांका; काय घडलं?
18
Maharashtra Election: राजघराण्यातील तीन व्यक्ती पहिल्यांदाच निवडणुकीच्या रिंगणात आमने-सामने
19
देशातील अशी 'ही' १४ गावं; जिथले ५००० मतदार महाराष्ट्र अन् तेलंगणातही करतात मतदान
20
धक्कादायक! तांत्रिकाच्या सांगण्यावरून संपूर्ण कुटुंब उद्ध्वस्त; वाराणसीत चार जणांच्या हत्येनंतर आत्महत्या

बुलडाणा: घरी शौचालय असणाऱ्या विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्याचे वाटप

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 15, 2018 2:53 PM

जानेफळ (बुलडाणा): घरी शौचालय बांधण्यासाठी पाल्यांनी आपल्या आई वडीलांकडे हट्ट धरावा आणि संपूर्ण गाव हागणदारीमुक्त व्हावे यासाठी येथील ग्रामसेवकाने अभिनव उपक्रम राबवित घरी शौचालय असणाऱ्या विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्याचे वाटप केले.

ठळक मुद्देसंपूर्ण गाव हागणदारीमुक्त व्हावे यासाठी येथील ग्रामसेवकाने अभिनव उपक्रम राबवित घरी शौचालय असणाऱ्या विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्याचे वाटप केले.विद्यार्थ्यांना आपल्या आई वडीलांकडे शौचालय बांधण्याचा हट्ट धरण्यासाठी शौचालय घरी असण्याचे फायदे पटवून दिले. मेहकर पंचायत समितीचे गटविकास अधिकारी रमाकांत पवार, सहाय्यक गटविकास अधिकारी अशोक सानप आदींच्या हस्ते विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्याचे वाटप करण्यात आले.

जानेफळ (बुलडाणा): घरी शौचालय बांधण्यासाठी पाल्यांनी आपल्या आई वडीलांकडे हट्ट धरावा आणि संपूर्ण गाव हागणदारीमुक्त व्हावे यासाठी येथील ग्रामसेवकाने अभिनव उपक्रम राबवित घरी शौचालय असणाऱ्या विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्याचे वाटप केले. यावेळी ज्यांच्याघरी शौचालय नाही, अशा विद्यार्थ्यांना आपल्या आई वडीलांकडे शौचालय बांधण्याचा हट्ट धरण्यासाठी शौचालय घरी असण्याचे फायदे पटवून दिले.स्वच्छ भारत मिशन अंतर्गत शौच्छालय बांधकामाचे उद्दिष्ट फेब्रुवारी २०१८ अखेरपर्यंत पुर्ण होवून गाव १०० टक्के हागणदारीमुक्त व्हावे यासाठी येथील ग्रामपंचायतचे ग्रामविकास अधिकारी डी.टी.तांबारे यांनी घरी शौचालय असणाºया विद्यार्थ्यांना स्वखर्चातून शैक्षणिक साहित्याचे वाटप केले असून त्यांच्या या अभिनव उपक्रमाचे कौतूक होत आहे. याबाबत जिल्हा परिषद मराठी पूर्व माध्यमिक शाळेत शुक्रवारी झालेल्या कार्यक्रमात मेहकर पंचायत समितीचे गटविकास अधिकारी रमाकांत पवार, सहाय्यक गटविकास अधिकारी अशोक सानप आदींच्या हस्ते विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्याचे वाटप करण्यात येवून ज्यांच्याघरी शौचालय नाही अशा विद्यार्थ्यांनी आपल्या आई वडीलांकडे शौचालय बांधण्यासाठी हट्ट धरावा आणि त्यांना प्रवृत्त करावे व तुमच्या घरी शौचालय बांधकाम पूर्ण झाल्यानंतर तुम्हाला सुध्दा मोठे बक्षीस देण्यात येईल, असे यावेळी ग्रामविकास अधिकारी डी.टी.तांबारे यांनी विद्यार्थ्यांना सांगितले. तसेच घरी शौचालय असण्याचे फायदे विद्यार्थ्यांना पटवून दिले. यावेळी विस्तार अधिकारी राजपूत, ग्रामसेवक निकम, झाल्टे, बचाटे, गवई, शिंदे, नवनिर्वाचित सरपंच विश्वनाथ हिवराळे, अमर राऊत, सैय्यद जाबीर, श्रीकृष्ण काकडे आदींसह गावातील नागरीक, मुख्याध्यापक पगारे तथा शिक्षक उपस्थित होते. (वार्ताहर)घरोघरी पोहचला शौचालय बांधण्याचा संदेशजानेफळ येथील ३५७ लोकांकडे अद्यापही शौच्छालय बांधण्यात आलेले नसल्याने अधिकाºयांच्या पथकासह ग्रामविकास अधिकारी तांबारे, ग्रा.पं. कर्मचारी, अंगणवाडी सेविका यांनी ९ जानवोरी रोजी संपूर्ण जानेफळ गावात फिरून शौचालय बांधण्याचा संदेश दिला. नवनिर्वाचित सरपंच, ग्रामपंचायत सदस्य यांनीसुध्दा या पथकाला सहकार्य केले.

 

 

टॅग्स :buldhanaबुलडाणा