- नीलेश जोशी लोकमत न्यूज नेटवर्कबुलडाणा: कोरोना संक्रमणाचा वेग जिल्हयात वाढला असून २० दिवसात जिल्ह्यात २,९२५ कोरोना बाधीतांची संख्या वाढून ती ६,७७० झाली आहे. त्यामुळे बुलडाणा जिल्ह्यात कोरोना बाधीत रुग्णांची संख्या दुप्पट होण्याचा वेग जवळपास २१ दिवसावर पोहोचला असल्याचे चित्र आहे. दरम्यान, आॅक्टोबरमध्ये कोरोना बाधीतांची संख्या आणखी झपाट्याने वाढण्याचा अंदाज आहे.दुसरीकडे आयसीएमआरने दिलेल्या संकेतानुसार बुलडाणा जिल्ह्यात सप्टेंबर अखेर ८,८७७ कोरोना रुग्ण राहतील असा अंदाज व्यक्त केला होता. सप्टेंबर महिना संपण्यास आणखी तीन दिवस बाकी असून सध्याच्या कोरोना बाधीतांची संख्या विचारात घेता आयसीएमआरने व्यक्त केलेला अंदाज हा आतापर्यंत ७६ टक्के तंतोतंत जुळला आहे. त्यामुळे आॅक्टोबरमध्येही कोरोना बाधीतांची संख्या झपाट्याने वाढणार असल्याचे संकेत मिळत आहे.नऊ सप्टेंबर रोजी बुलडाणा जिल्ह्यात कोरोना बाधीतांच्या संख्येने ४००० हजाराचा टप्पा गाठला होता. प्रतितीन दिवस ५०० रुग्ण या प्रमाणे कोरोना बाधीतांच्या आकड्यात भर पडत असून २७ सप्टेंबर रोजी हा आकडा ६,७७० वर येवून ठेपला आहे. त्यावरून कोरोना बाधीतांची संख्या २१ दिवसात दुप्पट होत असल्याचे सध्याचे चित्र आहे. जिल्ह्याचा मृत्यूदर सध्या १.२४ टक्के आहे.
बुलडाणा जिल्ह्यात २० दिवसात वाढले २,९२५ रुग्ण
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 28, 2020 9:56 AM