लोकमत न्यूज नेटवर्कबुलडाणा : प्रयोगशाळेत तपासणीसाठी पाठविलेल्या व रॅपिड टेस्ट केलेल्या ३,६६४ जणांचे अहवाल शुक्रवारी प्राप्त झाले. त्यापैकी ३,२७३ जणांचे अहवाल निगेटिव्ह आले असून ३९१ जणांचे अहवाल पॉझिटिव्ह आले आहेत.पॉझिटिव्ह आलेल्या अहवालांमध्ये मलकापूर २७, दाताळा २, बेलाड १, चिखली १६, शिरपूर ३, कोलारा १, शेलूद १, मेरा खुर्द १, भानखेडा १, वरखेड १, हातणी २, सवणा १, अमडापूर २, मालगणी १, नायगाव १, पळसखेड दौलत १, खामगाव २८, घारोड १, किन्ही महादेव १, सुटाळा १, शिर्ला नेमाने १, घाटपुरी २, उमरा अटाली १, नांदुरा ४०, पोटळी १, निमखेड १, नायगाव १, शेलगाव मुकुंद २, टाकरखेड १, काटी १, वडनेर १, शेगाव १४, भोनगाव ७, माटरगाव १, आडसूळ १, जळगाव जामोद ८, सुनगाव ४, खेर्डा २, झाडेगाव २९, कुरणगड १, मेहकर ११, हिवरा साबळे १, देऊळगाव माळी ३, हिवरा आश्रम ३, कळमेश्वर १, बऱ्हाई ४, देऊळगाव साकर्षा १, शेंदला ५, लोणार ८, शिवनगाव १, आरडव ४, बुलडाणा ५१, वरवंड १, मढ १, पाडळी १, मासरूळ १, करडी १, दुधा १, रुईखेड १, धामणदरी १, येळगाव १, गिरडा १, सुंदरखेड २, मोताळा ३, तळणी १, बोराखेडी ३, तरोडा ३, देऊळगाव राजा ३१, सिनगाव जहागीर ५, अंढेरा १, आळंद १, देऊळगाव मही २, खिरोडा १, पळशी झाशी १, एकलारा १, सि. राजा ६, लिंगा १, पांगरी उगले १, दुसरबीड २, पिंपळखुटा १, चिंचोली १ आणि जालना जिल्ह्यातील वरूड येथील १, वळसा वडाळा येथील १, अकोला ४, जळगाव खान्देशमधील राजणी १ तसेच बीड जिल्ह्यातील आंबेजोगाई येथील एकाचा यात समावेश आहे.दरम्यान, १७९ जणांनी कोरोनावर मात केली आहे. दुसरीकडे कोरोनाच्या चाचण्या वाढविल्यामुळे कोरोना बाधितांची संख्या जिल्हयात वाढत आहे. आतापर्यंत एकूण लोकसंख्येच्या सहा टक्के लोकांची कोरोना चाचणी झाली असून जिल्हयात सध्या २११ प्रतिबंधीत क्षेत्र आहेत.
बुलडाणा जिल्हयात ३९१ कोरोना पॉझिटिव्ह, १७९ जणांची मात
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 27, 2021 11:56 AM