लोकमत न्यूज नेटवर्कबुलडाणा: जिल्ह्यात रविवारी तपासण्यात आलेल्या ५०३ अहवालांपैकी ४२ जण कोराना बाधीत आढळून आले. दरम्यान, ५३ जणांनी कोरोनावर मात केली. दरम्यान, सध्या जिल्ह्यात एकूण कोरोना बाधीतांची संख्या ९,९०७ झाली असून ४८३ कोरोना बाधीतांवर उपचार करण्यात येत आहेत. तपासणी करण्यात आलेल्या ५०३ अहवालांपैकी ४६१ जणांचे अहवाल निगेटीव्ह आले आहेत.दरम्यान, पॉझिटिव्ह आलेल्यांमध्ये जयताळाोक, दत्तापूर एक, मेहर एक, रुधाना एक, वकाना एक, पिंपळगाव एक, पिंपळगाव गुरू एक, अंढेरा एक, देऊळगाव राजा दोन, नांदुरा एक, शेंबा एक, जळ पिंपळगाव एक, राहेरी बुद्रूक एक,, पळसखेड चक्का दोन, अमडापूर दोन, मनुबाई दोन, बोरगाव काकडे एक, नरवेल एक, मलकापूर तीन, सारोळा मारोती एक, धामणगाव बढे एक, शेगाव चार, माटरगाव एक, आडसूळ एक, सुलतानपूर तीन, मारोडा (जि. अकोला) एक, मालेगाव (नाशीक) एक, बोधेगाव (नगर) एक, लोहारा (जि. अकोला) एक, गुनातकल (कनार्टक) एक व अन्य एकाचा यात समावेश आहे. कोरानावर मात केलेल्या ५३ जणामध्ये देऊळगाव राजा कोवीड सेंटरमधील सात, मेहकर तीन, मलकापूर सात, नांदुरा सहा, लोणार तीन, बुलडाणा सहा, चिखली पाच, मोताळा पाच, संग्रामपूर पाच, शेगाव तीन आणि खामगाव येथील तीन जणांचा समावेश आहे. दरम्यान, कोरोना बाधीत रुग्ण बरे होण्याचे प्रमाणही नोव्हेंबर महिन्यात वाढले असल्याचे सुत्रांनी सांगितले.
बुलडाणा जिल्ह्यात ४२ पॉझिटिव्ह, ५३ जणांची कोरोनावर मात
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 09, 2020 4:31 PM