बुलडाणा: जिल्ह्यात बुधवारी तपासणी करण्यात आलेल्या २ हजार ८४५ संदिग्धांपैकी ४५ जण कोरोना बाधीत आढळून आले तर २ हजार ८०० जणांचे अहवाल निगेटीव्ह आले आहेत. प्राप्त पॉझिटिव्ह अहवालामध्ये प्रयोगशाळेतील २२ व रॅपीड टेस्टमधील २३ अहवालांचा समावेश आहे.
पॉझिटिव्ह आलेल्यांमध्ये बुलडाणा तालुक्यातील पाच, खामगाव सहा, शेगाव सहा, देऊळगाव राजा एक, चिखली १४, नांदुरा सात, लोणार एक, मोताळा एक, जळगाव जामोद एक, सिंदखेड राजा तालुक्यातील तीन जणांचा समावेश आहे. दरम्यान मलकापूर, मेहकर आणि संग्रामपूर तालुक्यातील तपासणी करण्यात आलेल्या संदिग्धांपैकी एकही जण कोरोना बाधीत आढळून आला नाही. दुसरीकडे ३४ जणांनी बुधवारी कोरोनावर मात केल्यामुळे त्यांना रुग्णालयातून सुटी देण्यात आली आहे. आतापर्यंत तपासणी करण्यात आलेल्या ५ लाख ९० हजार ८४६ संदिग्धांचे अहवाल निगेटीव्ह आले आहेत तर ८६ हजार १९८ कोरोना बाधितांनी आतापर्यंत कोरोनावर मात केली आहे.
१३३० अहवालांची प्रतीक्षा
तपासणीसाठी घेण्यात आलेल्या संदिग्धांच्या स्वॅब पैकी १ हजार ३३० जणांच्या अहवालाची अद्याप प्रतीक्षा आहे. जिल्ह्यातील एकूण कोरोना बाधितांची संख्या आता ८७ हजार ३८ झाली आहे. यापैकी १७६ सक्रीय रुग्णांवर रुग्णालयात उपचार करण्यात येत आहेत. दरम्यान आतापर्यंत जिल्ह्यात कोरोनामुळे ६६४ जणांचा मृत्यू झाला असल्याची माहिती निवासी उपजिल्हाधिकारी दिनेश गिते यांनी दिली.