लोकमत न्यूज नेटवर्कबुलडाणा: जिल्ह्यात मंगळवारी प्राप्त झालेल्या ६७० अहवालांपैकी ६६ जणांचे अहवाल पॉझिटिव्ह आले असून ७६ जणांनी कोरोनावर मात केली आहे. दरम्यान, जिल्ह्याील एकूण कोरोना बाधीतांची संख्या आता १० हजार ५५९ झाली असून त्यापैकी १०,०३१ जणांनी आतापर्यंत कोरोनावर मात केली आहे.मंगळवारी प्रयोगशाळेत तपासणीसाठी पाठविलेल्या व रॅपिड टेस्ट किटद्वारे तपासलेल्या अहवालांपैकी एकूण ६७० जणांचे अहवाल प्राप्त झाले. त्यापैकी ६०४ जणांचे अहवाल निगेटीव्ह आले आहेत. दरम्यान, पॉझिटिव्ह आलेल्यांमध्ये बुलडाणा सात, रायपूर एक, लोणार एक, मेहकर एक, पतापूर एक, भोसा एक, देऊळगाव माळी चार, खामगाव तीन, चांधई एक, तांदुळवाडी सहा, शेळगाव आटोळ एक, करवंड एक, चिखली सहा, तांदुळवाडी एक, मोताळा सहा, शेलापूर तीन, लिहा एक, माकोडी एक, शेलगाव एक, पिंपळगाव एक, सावरगाव एक, खांडवी एक, वडशिंगी एक, खेर्डा ३, वाडी खुर्द दोन, जळगाव जामोद एक, बावनबीर दोन, सि. राजा एक, शेगाव एक, मलकापूर एक, धरणगाव एक, देऊळगाव राजा तीन या प्रमाणे ६६ व्यक्ती कोरोना बाधीत आढळून आल्या. दरम्यान नोव्हेंबरच्या पहिल्या आठवड्याच्या तुलनेत रुग्ण वाढत आहे.
बुलडाणा जिल्ह्यात ६६ कोरोना पॉझिटिव्ह, ७६ जणांची मात
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 18, 2020 12:02 PM