लोकमत न्यूज नेटवर्कबुलडाणा : कोरोना संसर्गाचा प्रादुर्भाव जिल्ह्यात दिवसेंदिवस वाढत असून जुन महिन्यात प्रामुख्याने ही साथ जिल्हत वेगाने पसरली आहे. दरम्यान, गेल्या १८ दिवसात ७४ कोरोना बाधीत रुग्ण आढळून आले आहेत. दरम्यान गुरूवारी पातुर्डा येथे पुन्हा एक कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण आढळून आला आहे. त्यामुळे पातुर्डा येथील कोरोना बाधीतांची संख्या येथे १६ वर पोहोचली आहे.यात प्रामुख्याने मलकापूर शहर आणि संग्रामपूर तालुक्यातील पातुर्डा गावामध्ये संक्रमणाचा धोका वाढला असल्याचे चित्र आहे. दुसरीकडे जिल्ह्यातील कोरोना बाधीत रुग्ण बरे होण्याचे प्रमाण ६६ टक्क्यांवर पोहोचले आहे. अकोला प्रयोग शाळेत तपासणीसाठी पाठविण्यात आलेल्या ३९ अहवालांपैकी ३८ अहवाल निगेटीव्ह आले तर पातुर्डा येथील ६६ वर्षीय व्यक्तीचा अहवाल पॉझिटिव्ह आला आहे.दुसरीकडे आठ रुग्णांनी कोरोनावर मात केली असून त्यांना कोवीड केअर सेंटरमधून सुटी देण्यात आली आहे.अशाप्रकारे आज कोरोनावर मात करीत 8 रूग्णांनी घर गाठले आहे. जिल्ह्यात आतापयंत ९५ रुग्ण कोरोनामुक्त झाले असून रुग्ण बरे होण्याचे प्रमाण सध्या ६६ टक्के आहे. सध्या रूग्णालयात ४३ व्यक्तींवर उपचार करण्यात येत आहे. जिल्ह्यात आतापर्यंत एक हजार ९५२ अहवाल निगेटीव्ह आले असून जिल्ह्यातील कोरोना बाधीतांचा आकडा सध्या १४३ झाला आहे. १३८ अहवालांची अद्याप प्रतीक्षा आहे. बुलडाणा जिल्ह्यातील रोहिणखेड येथील एका कोरोना बाधीताचा १७ जून रोजी मध्यरात्री मृत्यू झाला आहे. ५५ वर्षीय या व्यक्तीवर १८ जून रोजी वैद्यकीय संकेतानुसार अंत्यसंस्कार झाले.
महिला पोलिस कर्मचाऱ्यास बुलडाण्यास हलविलेजानेफळ: येथील पोलिस ठाण्यात कार्यरत महिला पोलिस कर्मचाºयास ताप, खोकल्याचा त्रात होत असल्याने खबरदारीचा उपाय म्हणून बुलडाणा येथील आयसोलेशन कक्षात हलविण्यात आले आहे. १७ जून रोजीच तिला बुलडाणा येथे पाठविण्यात आले आहे. ही महिला पोलिस कर्मचारी काही कामानिमित्त अकोला येथे जावून आली अल्याची माहिती आहे. तेथून परत आल्यानंतर तिला त्रास होऊ लागला. त्यामुळे आरोग्य केंद्रात तपासणी केल्यानंतर तिला बुलडाणा येथे हलविण्यात आले आहे.