लोकमत न्यूज नेटवर्कबुलडाणा: जिल्ह्यात शुक्रवारी ८९ जण तपासणीमध्ये कोरोना बाधीत आढळून आले तर ३२ जणांनी कोरोनावर मात केली. प्रयोगशाळेत तपासणीसाठी पाठविलेल्या अहवालांपैकी एकूण २ हजार २५८ जणांचे अहवाल प्राप्त झाले. यापैकी २ हजार १६९ जणांचे अहवाल निगेटीव्ह आले आहेत.प्राप्त पॉझिटिव्ह अहवालामध्ये प्रयोगशाळेतील ७१ व रॅपीड टेस्टमधील १८ अहवालांचा समोश आहे. पॉझिटिव्ह आलेल्यांमध्ये बुलडाणा तालुक्यात ९, खामगाव तालुक्यात सात, शेगाव चार, देऊळगाव राजा एक, चिखली नऊ, मेहकर एक, मलकापूर तीन, नांदुरा एक, जळगाव जामोद १३, सिंदखेड राजा तालुक्यातील ४१ जणांचा समावेश आहे. दरम्यान लोणार, मोताळा आणि संग्रामपूर तालुक्यात तपासणी करण्यात आलेल्या संदिग्धांपैकी एकही जण कोरोना बाधीत आढळून आला नाही.दरम्यान ३२ जणांनी कोरोनावर मात केल्यामुळे त्यांना शुक्रवारी रुग्णालयातून सुटी देण्यात आली आहे. कोरोना बाधितांपैकी ८६ हजार १० जणांनी आतापर्यंत कोरोनावर मात केली आहे.
बुलडाणा जिल्ह्यात ८९ पॉझिटिव्ह, ३२ जणांची कोरोनावर मात
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 3, 2021 11:47 IST