लोकमत न्यूज नेटवर्कखामगाव: पश्चिम विदर्भातील सर्वात मोठय़ा जिल्हास्तरीय कृषी महोत्सवाचा समारोप सोमवारी संध्याकाळी झाला. या सोहळ्य़ात कृषिमंत्री तथा जिल्हय़ाचे पालकमंत्री ना. भाऊसाहेब फुंडकर यांनी उत्कृष्ट स्टॉलधारकांना सन्मानित केले. १६ फेब्रुवारी ते २0 फेब्रुवारी दरम्यान खामगाव येथील पॉलिटेक्निक ग्राउंडवर सुरू असलेल्या बुलडाणा जिल्हा कृषी महोत्सवाचा समारोप झाला. या समारोपीय कार्यक्रमाला राज्याचे कृषी व फलोत्पादन मंत्री ना. भाऊसाहेब फुंडकर, खामगाव मतदारसंघाचे आमदार अँड. आकाश फुंडकर, जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी प्रमोद लहाळे, डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. विलास भाले, नगराध्यक्ष . अनिता डवरे, पंचायत समिती सभापती ऊर्मिला गायकी, जिल्हा परिषद समाजकल्याण सभापती डॉ. गोपाल गव्हाळे, आत्माचे प्रकल्प संचालक नरेंद्र नाईक, जिल्हा परिषद सदस्य मालू ज्ञानदेवराव मानकर आदींची प्रमुख उपस्थिती लाभली होती. या सोहळ्य़ात कृषिमंत्री ना. भाऊसाहेब फुंडकर यांनी स्टॉलधारकांचे अभिनंदन करीत शेतकरी बांधवांचेही आभार मानले. उत्कृष्ट स्टॉलधारकांचा गटनिहाय कृषिमंत्री भाऊसाहेब फुंडकर यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. यामध्ये शासकीय / निमशासकीय गटात प्रथम जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी बुलडाणा यांनी प्रथम क्रमांक पटकावला, तर उपसंचालक, सामाजिक वनीकरण बुलडाणा द्वितीय, डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठ, अकोला यांनी तृतीय पुरस्कार पटकावला. व्यावसायिक निविष्टा गटात प्रथम महिको सिड्स लिमिटेड जालना प्रथम, अजित सिड्स लि. औरंगाबाद द्वितीय, नेटाफ्रेम ड्रिप इरिगेशन तृतीय यांना पुरस्कार मिळाला. कृषी यांत्रिकी व प्रक्रिया गटात प्रथम क्रमांक जैन इरिगेशन जळगाव खान्देश, शेती क्रांती फूड मशीन द्वितीय क्रमांक व पीकेव्ही अकोलाने तृतीय क्रमांक पटकावला आहे. पशुसंवर्धन, दुग्धव्यवसाय, कुक्कुटपालन गटात प्रथम क्रमांक म. फुले कृषी विद्यापीठ राहुरी, द्वितीय क्रमांक पृथ्वीराज हॅचरी पोल्ट्री अंडी केंद्र विहिगाव, ता. खामगाव व तृतीय क्रमांक कृष्णा गोट फार्म यांनी पटकावला आहे. सेंद्रिय शेती, औषधी वनस्पती व प्रक्रिया गटात कृष्णा फार्म्स गट मोताळा प्रथम, जय श्रीराम फार्म्स गट वडी, ता. नांदुरा द्वितीय, तर कृषी समृद्धी महिला गट येऊलखेड यांनी तिसरी क्रमांक पटकावला आहे. अन्न प्रक्रिया गटात प्रथम दुर्गामाता स्वयंसहाय्यता बचतगट भेंडवळ यांनी प्रथम, तुषार महिला बचत गट द्वितीय तर ओमसाई महिला बचत गट पारोळा यांनी तृतीय क्रमांक पटकावला आहे. अन्नपदार्थ दालन गटात प्रथम नवनिर्माण महिला स्वयंसहाय्यता गट, द्वितीय यशस्वी महिला बचत गट, तृतीय राधाबाई महिला बचत गट यांना गौरवित करण्यात आले. कृषी यांत्रिकीकरण गटात प्रथम क्रमांक जॉऩ डियर ट्रॅक्टर, रामा ट्रॅक्टर चिखली यांनी प्रथम तर एस्कॉर्टस ट्रॅक्टर्स, फिरके ऑटोमोबाइल मलकापूर द्वितीय क्रमांक व कॅप्टन ट्रॅक्टर्स भवानी ट्रॅक्टर्स खामगाव यांनी तृतीय क्रमांक पटकावला आहे.
सरकार शेतकर्यांच्या पाठीशी - भाऊसाहेब फुंडकर कृषी महोत्सवाच्या माध्यमातून शेतीसंबंधीच्या सर्व तंत्रज्ञानाची माहिती एकाच छताखाली उपलब्ध करून देण्याचा आम्ही प्रयत्न केला. पश्चिम विदर्भातील हजारो शेतकर्यांनी या महोत्सवाला भेट देऊन परिसंवाद व मार्गदर्शन कार्यक्रमाचा लाभ घेतला याचे समाधान आहे. भविष्यातसुद्धा शेतकर्यांना आवश्यक त्या सर्व प्रकारच्या सेवा-सुविधा पुरवण्यासाठी आम्ही सदैव तत्पर राहू, अशी ग्वाही कृषी फलोत्पादन मंत्री तथा जिल्हय़ाचे पालकमंत्री ना. भाऊसाहेब फुंडकर यांनी कृषी महोत्सवाच्या समारोपीय भाषणातून दिली.