शहरं
Join us  
Trending Stories
1
“सुप्रीम कोर्टाने काय करावे, हे आता एक पक्ष सांगणार का?”; चंद्रचूड यांनी ठाकरे गटाला फटकारले
2
'मी नेहमी संविधानाच्या मर्यादेचा आदर केला...', संविधान दिनानिमित्त पंतप्रधान मोदींचे भाष्य
3
“अशा निवडणुका पाकिस्तान, अफगाणिस्तानात होत नसतील, आयोग जिवंत आहे का”; संजय राऊत संतापले
4
मनोज जरांगेंचे ठरले; सरकार स्थापन झाल्यावर तारीख जाहीर करणार, पुन्हा बेमुदत उपोषणाला बसणार
5
पाकिस्तानात तख्तापालट होण्याचे संकेत? इम्रान खान यांच्या समर्थकांसोबत सैन्य; हस्तांदोलन, मिठ्या मारल्या 
6
"दहशतवादी संघटनांना चोख प्रत्युत्तर देणार"; २६/११च्या हल्ल्याच्या वर्षपूर्तीनिमित्त पंतप्रधान मोदींचे आश्वासन
7
झुनझुनवाला यांनी 10 मिनिटांत कमावले ₹105 कोटी; 'या' दोन शेअर्समुळे लागली लॉटरी; पडला पैशांचा पाऊस!
8
"अजित पवारांनी सरेंडर होऊन आमची..."; रामदास कदमांचे मोठं विधान, म्हणाले, "काहीही केलं तरी..."
9
नाना पटोलेंनी दिल्ली गाठली, मल्लिकार्जून खरगे-राहुल गांधींची भेट घेतली; नेमके काय घडले?
10
BLOG: अमित ठाकरे निवडणुकीच्या चक्रव्यूहात शिरले खरे, पण...; 'राजपुत्रा'चं नेमकं काय चुकलं? सहा प्रमुख मुद्दे
11
...म्हणून मुख्यमंत्रिपदाचा उमेदवार जाहीर करण्यास विलंब; भाजपचे 'या' कामाला प्राधान्य
12
आधारवाडीतील इमारतीच्या पंधराव्या मजल्यावर भीषण आग; अग्निशमन दलाचे वाहन बिघडले
13
राहुल गांधींचे नागरिकत्व रद्द होणार का? केंद्र सरकार १९ डिसेंबरला उच्च न्यायालयाला निर्णय कळविणार
14
Numerology: ‘या’ ६ मूलांक होतील मालामाल, धनलाभाचे योग; नोव्हेंबरची सांगता होईल खास!
15
"हिंदूंच्या हक्कांसंदर्भात बोलणारे निर्लज्ज, ...या सरकारला भारतातील अल्पसंख्यकांची चिंता नाही"; काय म्हणाले ओवेसी?
16
तिसऱ्या महायुद्धात अण्वस्त्रांचा वापर, एक तृतीयांश लोकसंख्या मारली जाणार; सिडनीच्या बिशपची भविष्यवाणी 
17
"हे फक्त शब्द नाहीत, इशारा आहे"; चिमुकलीवरील अत्याचाराच्या घटनेनंतर अमित ठाकरे संतापले
18
TV, OTT, AI सगळं एकाच ठिकाणी; टीव्हीसोबतच मिळणार सगळ्याचं 'सबस्क्रिप्शन'
19
महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीतील महायुतीच्या विजयानंतर, काँग्रेसची मोठी घोषणा; देशभरात खास मोहीम चालवणार 
20
"तुम्ही जिंकता तेव्हा ईव्हीएम चांगले अन् पराभूत झाले, तर..."; सुप्रीम कोर्टाने पिळले कान

बुलडाणा : जिल्हाधिकारी पोहोचले गारपीटग्रस्तांच्या बांधावर!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 15, 2018 1:28 AM

डोणगाव : परिसरातील मादणी, आरेगाव या परिसरात झालेल्या गारपिटीने शेकडो हेक्टरवरील हरभरा व गहू, लसण, कांदा, तूर, संत्रा या पिकांचे नुकसान झाल्याने शेतकरी हतबल झाला असून, गारपीटग्रस्त भागातील शेतकर्‍यांच्या नुकसानाचा सर्व्हे त्वरित करण्याचा आदेश जिल्हाधिकारी पुलकुंडवार यांनी कर्मचार्‍यांना दिला होता. 

ठळक मुद्देनुकसानग्रस्त शेतकर्‍यांशी केली चर्चा त्वरित सर्व्हे करण्याचे आदेश

लोकमत न्यूज नेटवर्कडोणगाव : परिसरातील मादणी, आरेगाव या परिसरात झालेल्या गारपिटीने शेकडो हेक्टरवरील हरभरा व गहू, लसण, कांदा, तूर, संत्रा या पिकांचे नुकसान झाल्याने शेतकरी हतबल झाला असून, गारपीटग्रस्त भागातील शेतकर्‍यांच्या नुकसानाचा सर्व्हे त्वरित करण्याचा आदेश जिल्हाधिकारी पुलकुंडवार यांनी कर्मचार्‍यांना दिला होता. डोणगाव परिसरातील गारपीटग्रस्त भागाची पाहणी १३ फेब्रुवारीला दुपारी २ वाजता जिल्हाधिकारी पुलकुंडवार, खासदार प्रतापराव जाधव, आमदार संजय रायमुलकर, जि.प.सदस्य आशिष रहाटे, जि.प.सदस्य राजेंद्र पळसकर, उपविभागीय अधिकारी नीलेश अपार, नायब तहसीलदार वैशाली जायगुडे, मीरा पागोरे, मंडळ अधिकारी रहोटे, तलाठी वंदना नाईक, भाजपा जिल्हा उपाध्यक्ष अँड.शैलेश देशमुख, मादणीचे उपसरपंच अमोल जाधव यांनी मादणी येथे येऊन प्रत्यक्ष शेतकर्‍यांच्या बांधावर जाऊन पाहणी केली. यावेळी जिल्हाधिकारी यांनी सदर आदेश दिले. यावेळी मादणी परिसरात नुकसान झालेल्या हरभरा, तूर, गहू, संत्रा, कांदा, लसून या  पिकांची पाहणी करून, तालुका कृषी अधिकारी सरोदे यांच्याकडून गारपीटग्रस्त गावाची माहिती घेऊन बाधित २७ गावांचा त्वरित सर्व्हे करून शासनाला देण्याचे निर्देश दिले. तर कृषी अधिकारी सरोदे यांनी युद्धपातळीवर शेतकरी नुकसानीचा सर्व्हे चालु असल्याचे सांगितले.यावेळी जिल्हाधिकारी यांनी नैसर्गिक आपत्तीत नुकसान झालेल्या शेतकर्‍यांचे सांत्वन करून त्वरित शासनाकडून मदत मिळवून देण्याचे आश्‍वासन दिले, तर जिल्हाधिकार्‍यांपुढे शेतकरी वर्ग व व्यापारी यांनी समस्या मांडल्या. यावेळी मादणी येथील कैलास जाधव, भाजपाचे प्रा.केशव वाहेकर, माजी उपसभापती सतीश ताजणे, माजी पं.स.सभापती पंजाबराव मेटांगळे, डॉ.उल्हामाले, माजी सरपंच मधुकरराव धिरके, प्रा.डॉ.सचिन जाधव, गणेश दिवठाणे, दीपक दिवठाणेसह शेतकरी उपस्थित होते.     

शेतकर्‍यांना मदतीची हेक्टरी र्मयादा वाढवा-जाधवशासनाने आपत्तीग्रस्त शेतकर्‍यांना दोन हेक्टरपर्यंत ठेवलेली र्मयादा वाढवावी, कारण विदर्भातील शेतकर्‍यांचे अतोनात नुकसान या अवकाळी गारपिटीमुळे झालेले आहे, तसेच विदर्भातील शेतकर्‍यांकडे जमिनीचे क्षेत्र अधिक असल्याने शासनाने दोन हेक्टरी मदतीची र्मयादा वाढवून जेवढे नुकसान शेतकर्‍यांचे झाले तेवढी मदत शासनाने द्यावी, अशी मागणी यावेळी खासदार प्रतापराव जाधव यांनी केली.

गतवर्षीचे पैसे केव्हा मिळणार! मादणीचे उपसरपंच अमोल जाधव यांनी जिल्हाधिकारी पुलकुंडवार यांना सन २0१५-१६ मधील फळबाग आपत्तीची मदत अद्यापपर्यंत शेतकर्‍यांना सर्व्हे होऊन मिळालेली नाही. तर मग आता हा गारपिटीचा सर्व्हे करुन आम्हाला मदत केव्हा मिळणार, असा प्रश्न करताच जिल्हाधिकारी यांना सदर प्रकरणाची चौकशी करुन मला त्वरित अहवाल द्या, असा सर्वांसमक्ष आदेश कृषी अधिकारी सरोदे व तलाठी नाईक यांना दिला 

टॅग्स :buldhanaबुलडाणाcollectorतहसीलदार