लोकमत न्यूज नेटवर्क बुलडाणा: जिल्ह्यात कोरोनाबाधीत रुग्ण बरे होण्याचे प्रमाण ९३ टक्क्यांवर पोहोचले असून जिल्ह्याचा मृत्यूदर सध्या १.५३ टक्क्यांवर स्थिरावला आहे. आतापर्यंत जिल्ह्यात ८,००७ बाधीत रुग्ण कोरोनामुक्त झाले आहेत. दुसरीके मंगळवारी जिल्ह्यात ८१ संदिग्ध पॉझिटिव्ह आढळून आले तर ४९३ जणांचे अहवाल निगेटीव्ह आले. मंगळवारी एकूण ५७४ जणांची कोरोना चाचणी करण्यात आली होती.पॉझिटिव्ह आलेल्यांमध्ये मोताळा दोन, बुलडाणा आठ, दुधा एक, चौथा दोन, देऊळगाव राजा चार, सावखेड भोई तीन, मेरा बुद्रूक तीन, सवणा तीन, खैरव एक, दिवठाणा एक, लोणार दोन, खापरखेड घुले एक, नांदुरा दोन, मेहकर सहा, उकळी एक, बदलापूर एक, कळंबेश्वर एक, गुंजखेड एक, बऱ्हाई एक, काळेगाव एक, मोळा चार, पिंपळगाव माळी एक, देऊळगाव माळी दोन, धानोरी एक, आरेगाव पाच, जळगाव सहा, आडेळ बुद्रूक एक, मलकापूर दहा, धोंगर्डी एक, दाताला एक, टेभुर्णा एक, शिरसगाव देशमुख एक आणि वाशिम जिल्ह्यातील रिसोड तालुक्यात असलेल्या गवंधळा येथील एक तसेच जालना जिल्ह्यातील धावडा येथील एका बाधीताचा समावेश आहे.दरम्यान मंगळवारी ५८ जणांनी कोरोनावर मात केल्यामुळे त्यांना रुग्णालयातून सुटी देण्यात आली. लोणार कोवीड केअर सेंटरमधून सहा, बुलडाणा येथून दहा देऊळगाव राजा येथून सहा, चिखली येथून सहा, मेहकर चार, सिंदखेड राजा दोन, खामगाव १६, जळगाव जामोद एक, नांदुरा दोन, शेगाव तीन, मलकापूर सेंटरमधील दोघांचा यात समावेश आहे.
बुलडाणा जिल्ह्यात कोरोनाबाधीत रुग्ण बरे होण्याचे प्रमाण ९३ टक्के
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 21, 2020 12:14 PM