शहरं
Join us  
Trending Stories
1
मतांमधील तफावतीबाबत 'लोकमत'च्या बातमीवर निवडणूक आयोगाचं स्पष्टीकरण, म्हणाले...
2
राज्याचे नवे मुख्यमंत्री कोण? सस्पेन्स अजून कायम; १ किंवा २ डिसेंबरला शपथविधी होणार
3
Today Daily Horoscope: आजचे राशीभविष्य: प्रिय व्यक्तीच्या सहवासात रोमांचित व्हाल!
4
निवडून येतात तेव्हा गपगार, पराभवानंतर EVM ला दाेष; काेर्टाने याचिकाकर्त्यांना फटकारलं
5
कुजबुज! एका छताखाली कोणता झेंडा हाती?; पराभूत उमेदवार आता देवदर्शन करणार
6
प्रत्येक निवडणुकीनंतर EVM विरोधात घोंघावणारे हे वादळ कायमस्वरूपी शमविण्याची गरज
7
...तर महाराष्ट्रात खळबळ उडेल; उद्धव - राज यांनी एकत्र येण्याला आणखी कुठला मुहूर्त हवा?
8
गुजरात ते मुंबई प्रवासात हत्येचा थरार?; तीन वर्षांनी हत्येचा गुन्हा, तपास सुरू
9
...तोपर्यंत कांजूर डम्पिंग बंद करणे अशक्य; मुंबई महापालिका पर्यायी जागेच्या शोधात
10
पश्चिम रेल्वेवर वाढणार एसी लोकलच्या १३ फेऱ्या; वातानुकूलित फेऱ्यांची संख्या ९६ वरून १०९
11
इन्फ्लुएंझामुळे मुंबईकर ‘आजारी’, राज्यात ५७ रुग्णांचा मृत्यू; काय आहेत लक्षणे?
12
झुनझुनवाला यांनी 10 मिनिटांत कमावले ₹105 कोटी; 'या' दोन शेअर्समुळे लागली लॉटरी; पडला पैशांचा पाऊस!
13
विद्यार्थ्यांच्या नोंदणीसाठी शिक्षकांचे 'अपार' कष्ट; २५ टक्के नोंदणी अपूर्ण
14
शेती आणि शेतकरी - यंदाच्या महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीतून दोघेही हद्दपार!
15
‘कॉर्पोरेट’ प्रचार, फतवे अन् व्हायरल इंडिया; निवडणुकीचा प्रचार झालाय हाय-टेक
16
आधारवाडीतील इमारतीच्या पंधराव्या मजल्यावर भीषण आग; अग्निशमन दलाचे वाहन बिघडले
17
Numerology: ‘या’ ६ मूलांक होतील मालामाल, धनलाभाचे योग; नोव्हेंबरची सांगता होईल खास!
18
"हिंदूंच्या हक्कांसंदर्भात बोलणारे निर्लज्ज, ...या सरकारला भारतातील अल्पसंख्यकांची चिंता नाही"; काय म्हणाले ओवेसी?
19
तिसऱ्या महायुद्धात अण्वस्त्रांचा वापर, एक तृतीयांश लोकसंख्या मारली जाणार; सिडनीच्या बिशपची भविष्यवाणी 
20
"हे फक्त शब्द नाहीत, इशारा आहे"; चिमुकलीवरील अत्याचाराच्या घटनेनंतर अमित ठाकरे संतापले

बुलडाणा जिल्ह्यात कोरोना रुग्ण बरे होण्याचे प्रमाण ५९ टक्क्यांवर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 01, 2021 12:35 PM

coronavirus news गेल्या वर्षी जेथे ९७ टक्के रुग्ण बरे होण्याचे प्रमाण होते तेथे ते नववर्षात ५९ टक्क्यांवर आले आहे.

लोकमत न्यूज नेटवर्कबुलडाणा : नववर्षाचे दोन महिने संपुष्टात आले असून, गतवर्षीच्या कोरोना बाधितांशी तुलना करता रुग्ण बरे होण्याचे प्रमाण झपाट्याने घसरले असल्याचे समोर येत आहे. गेल्या वर्षी जेथे ९७ टक्के रुग्ण बरे होण्याचे प्रमाण होते तेथे ते नववर्षात ५९ टक्क्यांवर आले आहे. परिणामी जिल्ह्यात सक्रिय रुग्णांचे प्रमाण वाढले आहे. त्यामुळेच आता आरोग्य प्रशासनाकडून नवीन कोविड केअर सेंटरसाठी जागा शोधण्याची मोहीमच हाती घेतल्याचे चित्र आहे. बुलडाणा जिल्ह्यातील कोरोना बाधित रुग्णांची संख्या १८ हजार ६६८ असून, त्यापैकी १५ हजार ७७६ रुग्ण हे आतापर्यंत बरे झाले आहेत. आतापर्यंतचा विचार करता रुग्ण बरे होण्याचे सरासरी प्रमाण हे ८४.५०  टक्के (प्रोग्रेसिव्ह) अर्थात ८५ टक्के आहे. मात्र, नववर्षातील कोरोना बाधितांची संख्या व त्यातुलनेत उपचारानंतर बरे झालेल्यांची संख्या याचा विचार करता रुग्ण बरे होण्याचे प्रमाण हे ५९ टक्के आहे. गेल्या वर्षीच्या रुग्ण बरे होण्याच्या प्रमाणाशी तुलना करता हे प्रमाण ३८ टक्क्यांनी घसरले असल्याचे एकंदरीत आकडेवारी सांगते. त्यामुळे जिल्ह्यातील १४ कोविड केअर सेंटर, कोविड समर्पित रुग्णालय आणि कोविड हेल्थ केअर हॉस्पिटलमध्ये सक्रिय रुग्ण वाढले आहेत. एक प्रकारे ही धोक्याची घंटा असल्याचे चित्र आहे. मात्र, कोरोना लसीकरण मोहीम सुरू असल्याने येत्या काळात कोराना बाधितांचे प्रमाण आणखी कमी होण्याची शक्यता सुत्रांनी व्यक्त केली आहे.

टॅग्स :buldhanaबुलडाणाcorona virusकोरोना वायरस बातम्या