बुलडाणा, दि. १२: लोणार तालुक्यात कावीळची साथ आली असून, आतापर्यंंत चार नागरिकांचा बळी गेला आहे. यासोबतच चिखली येथे डेंग्यूचा रूग्ण आढळला असून, जानेफळ व डोणगाव येथे तापाची साथ पसरली आहे.*प्राथमिक आरोग्य केंद्राकडून डेंग्यू रूग्णाकडे दुर्लक्षचिखली तालुक्यातील एकलारा येथील प्राथमिक आरोग्य केंद्रातील वैद्यकीय कर्मचार्यांकडून डेंग्यूची लागण झालेल्या रुग्णाकडे दुर्लक्ष होत असल्याचा आरोप भोरसा-भोरसी येथील नंदकिशोर भुसारी यांनी केला आहे.*लोणार तालुक्यात काविळची साथतालुक्यातील गावांमध्ये कावीळ आजाराने थैमान घातले असून, तीन महिन्यांत चार जणांचा मृत्यू झाला आहे. तसेच शुक्रवारी चिंचोली सांगळे येथील तरुणाचा मृत्यू झाल्याने या आजाराचे प्रमाण वाढतच असल्याचे निदर्शनास येत आहे. आरोग्य विभागाचे याकडे दुर्लक्ष होत आहे. गत चार महिन्यात निर्जला शिवानंद सांगळे (३८), दत्ता लक्ष्मण मोतेकर (२२), अश्विनी गजानन कांबळे यांच्यासह चौघांचा मृत्यू झाला.
बुलडाणा जिल्ह्यात कावीळसह तापाचा प्रकोप!
By admin | Published: August 13, 2016 1:13 AM