लोकमत न्यूज नेटवर्कबुलडाणा : जिल्ह्यात गत काही दिवसांपासून युरीयाचा प्रचंड तुटवडा निर्माण झाला आहे.काही कृषी सेवा केंद्र संचालक युरीयाचा साठा करून जादा दराने विक्री करीत आहेत. अशा स्थितीत जिल्ह्याला २७०० मॅट्रिक टन युरीया खत मिळाले आहे. त्यामुळे, शेतकऱ्यांना दिलासा मिळाला आहे.यावर्षी मृग नक्षत्रातच चांगला पाउस झाल्याने अनेक शेतकऱ्यांनी पेरणी आटोपली होती. त्यानंतर अनेक शेतकºयांचे बियाणे उगवले नसल्याने त्यांच्यावर दुबार पेरणीचे संकट ओढवले.सध्या पिकांना युरीया खताची गरज असताना जिल्ह्यात तुटवडा निर्माण झाला होता. या संधीचा लाभ घेत अनेक कृषी संचालकांनी काळाबाजार सुरू केला होता. सिंदखेड राजा तालुक्यात अनेक गावांमध्ये शेतकºयांना कृषी सेवा केंद्रावर रांगा लावून युरीया खतांची खरेदी करावी लागत होतीजिल्ह्यातील शेतकरी बोगस बियाणांमुळे आगोदरच ञस्त असतांना आता युरीया खताची कुञीम तुटवडा निर्माण करून शेतकºयांची लूट करण्यात येत असल्याचे चिञ सध्या जिल्ह्यात दिसत आहे. सध्या कपाशी, मूग, उडीद व इतर पिकांची कोळपणी झाली असून या पिकांची वाढ होण्यासाठी युरीया खताची सध्या नितांत गरज शेतकºयांना आहे. पण युरीया खत मिळत नसल्याने शेतकरी रोजच कुषी केंद्रावर चकरा मारत होते. या पिकांना जर हे खत वेळेत दिले नाही तर या पिकांची पाहीजे तशी वाढ होणार नाही. त्यामुळे पिकांना झडती सुद्धा येणार नसल्याने उत्पादनात मोठी घट होण्याची शक्यता होती. जिल्ह्याला गुरूवारी २७०० मॅट्रिक टन युरीया मिळाला आहे. त्यामुळे, युरीयाचा तुटवडा काही प्रमाणात कमी होणार आहे. सध्या अनेक पिकांना गरज नसताना शेतकरी खत देत असल्याचे चित्र आहे. तसेच खत मिळत नसल्याने अनेकांनी गरजेपेक्षा जास्त खरेदी करून ठेवली आहे. त्यामुळे, युरीया खताचा तुटवडा निर्माण झाल्याचे चित्र आहे. सद्यस्थितीत कडधान्य पिकांना युरिया देण्याची गरज नाही. जमीन आरोग्य पत्रिकेतील पिकांच्या वाढीच्या अवस्थेनुसार शिफारसीत खतांची मात्रा देण्यात यावी, असे आवाहन कृ षी विभागाने केले आहे. जिल्ह्यातील कृषी सेवा केंद्रावर लवकरच युरीया उपलब्ध होणार असल्याने शेतकºयांना दिलासा मिळाला आहे.
सप्टेंबरपर्यंत मागणीनुसार युरिया मिळणारजिल्ह्यात २७०० मॅट्रिक टन युरिया उपलब्ध झाला आहे. खरीप हंगामात एकूण मंजूर आवंटनानुसार खते उपलब्ध होत आहेत.सप्टेंबरपर्यंत जिल्ह्याला युरीया मिळणार आहे. त्यामुळे, टंचाई निर्माण नाही. तरी शेतकºयांनी खते साठवणूक करून ठेवू नये. सद्यस्थितीत कडधान्य पिकांना युरिया देण्याची गरज नाही. जमीन आरोग्य पत्रिकेतील पिकांच्या वाढीच्या अवस्थेनुसार शिफारसीत खतांची मात्रा देण्यात यावी, असे जिल्हा परिषदेच्या कृषी विकास अधिकारी अनिसा महाबळे यांनी केले आहे.