लोकमत न्यूज नेटवर्कखामगाव: कोरोनानंतर मंगळवारी संध्याकाळी पाच वाजता वादळी वाऱ्यासह झालेल्या गारपीटीने सर्वत्र दाणादाण उडाली. खामगाव, जळगाव, नांदुरा, मलकापूर तालुक्यात गारपीट झाली. तालुक्यातील वादळी वारा, पाऊस व गारपिट झाली. गहू, कांदा, हरभरा पिकाचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले.
जळगाव तालुक्यातही गारपीटजळगाव जामोद तालुक्यात १७ मार्च रोजी संध्याकाळी साडेपाच वाजताचे दरम्यान वादळी वाºयासह गारपीट झाल्याने गहू हरभरा, भुईमुंग, कांदा सूर्यफूल, संत्रा आणि मका इत्यादी पिकाचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. संध्याकाळी वादळी वाºयासह जोराचा पाऊस आणि गारांचा वर्षाव झाला. यावेळी आसलगाव, जळगाव, खेर्डासह संपूर्ण तालुक्यात तालुक्यामध्ये बोरा एवढ्या गारा पडल्या. यामुळे शेतातील पिकांची हानी झाली. सोंगनी वर आलेला गहू हरभरा वादळामुळे पसरला. तर कांद्याचे गारपिटीमुळे नुकसान झाले. यामध्ये जळगाव वरवाट रस्त्यावर झाडे कोसळून वाहतूक प्रभावित झाली.
वसाडी परिसरात गव्हाचे मोठे नुकसानयावर्षी सुरवातीपासूनच शेतकऱ्यांसमोरील संकट कमी होताना दिसत नाही. मंगळवारी संध्याकाळी वसाडी परिसरात वादळी वाºयासह झालेल्या गारपीटीने गव्हाचे मोठे नुकसान झाले. निसर्गाने शेतकºयांचे कंबरडे मोडल्याचे दिसून येते. सुगीचे दिवस पाहत असतानाच हाता तोंडाशी आलेले पीक निसटले आहे. आधीचे ज्वारी, तूरीचे नुकसान झाले. आता गहू, हरभºयाचे नुकसान झाल्याने शेतकरी पुन्हा आर्थीक संकटात सापडला आहे. खामगाव तालुक्यात चांगला जलसाठा असल्याने शेतकºयांनी मोठ्या प्रमाणात रब्बी पिकांची पेरणी केली होती. निसर्गाच्या लहरीपणा शेतकºयांना फटका बसला.