लोकमत न्यूज नेटवर्कबुलडाणा: गेली दोन दिवस संततधार पाऊस झाल्याने शेतकरी सुखावला असून जिल्ह्याची सरासरी ४१.६८ टक्के झाली आहे. दरम्यान चार तालुक्यांत वार्षिक सरासरीच्या ५० टक्क्यांपेक्षा अधिक पाऊस झाला आहे.यामध्ये प्रामुक्याने चिखली, सिंदखेड राजा, लोणार आणि मेहकर तालुक्यांचा समावेश आहे. दरम्यान शुक्रवारी पावसाने जिल्ह्यात विश्रांती घेतली होती. शुक्रवारी सरासरी केवळ १.९ मिमी पाऊस झाला. केवळ संग्रामपूर तालुक्यात १३.३ मिमी ऐवढा पाऊस झाला आहे. बुलडाणा जिल्ह्यात वार्षिक सरासरी ७६१.६ मिमी पाऊस पडतो. त्या तुलनेत आतापर्यंत जिल्ह्यात ३१७.४ मिमी पाऊस पडला आहे. वार्षिक सरासरीच्या तो ४१.६८ टक्के आहे. यामध्ये चिखली तालुक्यात ५२.८७ टक्के, सिंदखेड राजामध्ये ६०.३२, लोणार ५०.९७ आणि मेहकर तालुक्यात ६५.६२ टक्के पाऊस झाला आहे. अन्य तालुक्यात पावसाने वार्षिक सरासरीची ५० शीही अेालांडली नाही. प्रकल्पांमधील जलसाठ्यातही त्यामुळे अपेक्षीत वाढ झालेली नाही.
दोन तालुक्यात कमीशेगाव आणि जळगाव जामोद तालुक्यात यंदा तुलनेने कमी पाऊस झाला आहे. जळगाव जामोद तालुक्यात वार्षिक सरासरीच्या अवघा २०.६९ टक्के तर शेगावमध्ये २४.५१ टक्केच पाऊस झाला आहे. अन्य तालुक्यातही सरासरी ४० टक्क्यांच्या आत पाऊस असल्याने प्रकल्पांमध्येही अपेक्षीत जलसाठा झालेला नाही.