- नीलेश जोशी लोकमत न्यूज नेटवर्कबुलडाणा: गेल्या एक दशकापासून दुष्काळाच्या गर्तेत अडकलेल्या बुलडाणा जिल्ह्यातील पाच तालुक्यातील दोन लाख १२ हजार शेतकऱ्यांना अद्यापही गत वर्षी दुष्काळामुळे झालेल्या नुकसानाची भरपाई अद्याप मिळालेली नाही. ही रक्कम जवळपास १३९ कोटींच्या घरात जाते. दरम्यान, महाजनादेश यात्रेच्या निमित्ताने जिल्ह्यात येत असलेल्या मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी याअनुषंगाने शेतकºयांना दिलासा द्यावा, अशी अपेक्षा व्यक्त होत आहे.प्रामुख्याने बुलडाणा, चिखली, देऊळगाव राजा, मेहकर आणि जळगाव जामोद तालुक्यातील ५८६ गावातील दोन लाख २७२ हजार हेक्टर क्षेत्र या पाच तालुक्यात बाधीत झाले होते. गतवर्षी वार्षिक सरासरीच्या जवळपास ३१ टक्के पाऊस कमी पडल्यामुळे बुलडाणा जिल्ह्यात दुष्काळ जाहीर करण्यात आला होता. पहिल्या टप्प्यात आठ तालुक्यातील ५५ मंडळामधील ८३४ गावांमध्ये दुष्काळ ३१ आॅक्टोबर रोजी जाहीर करण्यात आला होता. नवीन निकषाच्या आधारावर हा दुष्काळ जाहीर झाला होता. मात्र जिल्ह्यातील अन्य पाच तालुक्यातील ३८ मंडळामधील ५८६ गावांचीही स्थिती बिकट होती. त्यानुषंगाने कृषी राज्यमंत्री सदाभाऊ खोत यांनी बुलडाणा येथे २७ आॅक्टोबर २०१८ रोजी झालेल्या बैठकीत उर्वरित मंडळामध्ये पडलेला पाऊस, पीक कापणी प्रयोगाचा अहवाल आणि उत्पादकतेसंदर्भातील अहवालाचा मॅन्युअली अभ्यास करून पुढील निर्णय घेण्याचे निर्देश दिले होते. त्यासंदर्भाने सहा नोव्हेंबर २०१८ ते २१ फेब्रुवारी २०१९ दरम्यान उर्वरित ३८ मंडळातील ५८६ गावात दुष्काळ जाहीर झाला होता.मात्र प्रत्यक्षात पहिल्या टप्प्यातील मोताळा, मलकापूर, खामगाव, शेगाव, नांदुरा, संग्रामपूर, लोणार आणि सिंदखेड राजा तालुक्यातील ८३४ गावातील तीन लाख २० हजार ३०८ शेतकºयांना १९५ कोटी २४ लाख ३१ हजार ३५३ रुपयांची मदत देण्यात आली होती. पहिल्या टप्प्यात दुष्काळ जाहीर झालेल्या उपरोक्त गावातील शेतकºयांना ९८ टक्के मदत वाटप करण्यात आली होती. दरम्यान, पहिल्या टप्प्यात दुष्काळ घोषित झालेल्या भागातही ८९ कोटी २२ लाख ३७ हजार रुपयांचा निधी वाटप करणे बाकी आहे. त्यानुषंगाने जिल्हाधिकारी कार्यालयाने अमरावती आयुक्त कार्यालयाकडे अनुषंगीक मागणी केलेली आहे. मात्र अद्यापही रक्कम मिळालेली नाही. तहसिल कार्यालयाकडूनही त्याची मागणी होत आहे. उर्वरित पाच तालुक्यातील ५८६ गावांतील शेतकºयांनाही दुष्काळामुळे झालेल्या नुकसानाची भरपाई आॅगस्ट २०१९ उजाडले असतानाही मिळालेली नाही. यासंदर्भात विभागीय आयुक्त कार्यालयाकडे २० जुलै रोजीच प्रस्ताव पाठविला आहे. मात्र अद्यापही रक्कम उपलब्ध झाली नाही. यंदा जिल्ह्यात दमदार पाऊस असला तरी प्रकल्पातील जलसाठ्यामध्ये मात्र वाढ झालेली नाही.
पाच तालुक्याील शेतकºयांच्या दुष्काळी मदतीचा प्रस्ताव विभागीय आयुक्तांकडे पाठविण्यात आला आहे. दरम्यान, पहिल्या टप्प्यातील ८९ कोटी रुपयांचाही प्रस्ताव पाठविण्यात आलेला आहे.-भिकाजी घुगेनिवासी उपजिल्हाधिकारी, बुलडाणा