शहरं
Join us  
Trending Stories
1
IPL Auction 2025: 'अनुभवी' अश्विनसाठी दोन जुने संघ भिडले, अखेर CSK ने RR ला दिली मात, कितीला विकत घेतलं?
2
'ज्यांनी मला त्रास दिला ते सगळे साफ झाले', अशोक चव्हाणांची थोरात-देशमुखांवर बोचरी टीका
3
IPL Auction 2025: मुंबई इंडियन्सने सोडलेला जोफ्रा आर्चर अखेर राजस्थान रॉयल्समध्ये गेला, किती मिळाली किंमत?
4
शिवसेना मुख्यमंत्री पदावर अडीच वर्षासाठी दावा करणार? केसरकर स्पष्टच बोलले...!
5
IPL Auction 2025 : MI नं दिला नाही भाव; Ishan Kishan साठी काव्या मारन यांनी लावली एवढ्या कोटींची बोली
6
IPL Auction 2025 : बिग सरप्राइज! SRK च्या KKR नं रिलीज केलेल्या खेळाडूसाठी मोजली मोठी किंमत, अनेकांच्या भुवया उंचावणारी बोली
7
'तरुण नेतृत्व उभारणार, घरी बसणार नाही', पराभवानंतर शरद पवार नव्या जोमाने कामाला लागले
8
IPL Auction 2025: Gujarat Titans ची शांतीत क्रांती! ३ मॅचविनर खेळाडूंना 'गपचूप' घेतलं ताफ्यात, पाहा कोण?
9
"योगी आदित्यनाथांच्या 'त्या' घोषणेमुळे...";'बटेंगे तो कटेंगे'वर शरद पवारांचे महत्त्वाचे विधान
10
"...त्यामुळे महिलांनी आमच्या विरोधात मतदान केलं"; निकालानंतर शरद पवारांची पहिली प्रतिक्रिया
11
IPL 2025 Auction : १८ कोटींच पॅकेज नाकरणाऱ्या KL Rahul साठी DC नं किती कोटी मोजले ?
12
"EVM बाबत माहिती नाही, पण लोक सांगतात की..."; पराभवानंतर शरद पवारांचे मोठं विधान
13
महायुतीच्या विजयात CM योगींची किती मोठी भूमिका? चंद्रशेखर बावनकुळे म्हणतात...
14
IPL Auction 2025: युजवेंद्र चहलला १७७ % 'अप्रेझल'! बनला सर्वात महागडा स्पिनर, पंजाब किंग्जने घेतलं संघात
15
"काय झालं हेच आम्हाला कळेना...;" निवडणूक निकालाच्या दुसऱ्या दिवशी काँग्रेसनं सांगितला पुढचा प्लॅन
16
TATA IPL Auction 2025 Live: इशान किशन हैदराबादच्या ताफ्यात; SRH ने लावली 11.25 कोटींची बोली...
17
IPL Auction 2025: व्वा पंत... मानलं ! अवघ्या १५ मिनिटात इतिहास बदलला, रिषभ सर्वात महागडा खेळाडू ठरला!!
18
विधानसभा संपल्या, आता विधान परिषदेवर लक्ष; महायुतीच्या कोणत्या 6 नेत्यांना लागणार लॉटरी?
19
बनावट ASP बनून फिरली, पोलिसांनी केलं सॅल्यूट; एक छोटीशी चूक होताच झाली पोलखोल
20
"नियोजनाप्रमाणे प्रचार केला नाही"; काँग्रेस नेत्याने शरद पवार-ठाकरेंवर फोडलं पराभवाचे खापर

बुलडाणा जिल्हय़ातील ३५६ गावांना गारपिटीचा तडाखा!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 12, 2018 1:33 AM

बुलडाणा/खामगाव: जिल्हय़ातील ३५६ गावांना गारपीट व अवकाळी पावसाचा तडाखा बसला असून, वीज पडून मोताळा तालुक्यात गंभीर जखमी झालेल्या दोन बहिणींपैकी दुपारी एकीचा मृत्यू झाला. नांदुरा तालुक्यातील वसाडी येथे झाड अंगावर पडून एकाचा मृत्यू झाला. गारपिटीच्या तडाख्यात सापडलेले ११ जण जखमी झाले आहेत. 

ठळक मुद्देवीज आणि झाड पडून दोन ठार गारपिटीदरम्यान जिल्हय़ात १२ जखमी 

नीलेश जोशी/योगेश फरपट । लोकमत न्यूज नेटवर्कबुलडाणा/खामगाव: जिल्हय़ातील ३५६ गावांना गारपीट व अवकाळी पावसाचा तडाखा बसला असून, वीज पडून मोताळा तालुक्यात गंभीर जखमी झालेल्या दोन बहिणींपैकी दुपारी एकीचा मृत्यू झाला. नांदुरा तालुक्यातील वसाडी येथे झाड अंगावर पडून एकाचा मृत्यू झाला. गारपिटीच्या तडाख्यात सापडलेले ११ जण जखमी झाले आहेत. राज्य शासनाच्या स्थायी आदेशानुसार महसूल यंत्रणेने गारपिटीचा सर्व्हे करण्यास प्रारंभ केला असून, मंडळ अधिकारी, तहसीलदारांनी त्यासाठी सकाळीच शेतशिवार गाठले होते. सोबतच कृषिमंत्री पांडुरंग फुंडकर यांनी कृषी अधिकारी व विमा अधिकार्‍यांची तातडीने बैठक घेऊन आनुषंगिक कार्यवाही करण्याचे आदेश यंत्रणेला दिले आहेत.बुलडाणा जिल्हय़ातील तेराही तालुक्यात गारपिटीसह वादळी पावसाने हजेरी लावली. यामध्ये जिल्हय़ातील संत्रा, मोसंबी, गहू, हरभरा, आंबा, कांदा, डाळिंब, द्राक्ष बागांचे मोठे नुकसान झाले आहे. दिवसभर जिल्हय़ात ढगाळ वातावरण होते, तर ठरावीक अंतराने जिल्हय़ात पाऊस पडला. जिल्हय़ात दुपारीही काही गावांमध्ये गारपीट झाली. प्रारंभी १५ ते २0 मिनिट गारपीट झाल्यानंतर  पावसाने हजेरी लावली. प्रारंभी बोराएवढय़ा पडणार्‍या गारा नंतर लिंबाएवढय़ा पडू लागल्या होत्या. 

घाटाखाली शेतमजुरासह चिमुकला जखमीघाटाखालील नांदुरा, संग्रामपूर, खामगाव आणि जळगाव जामोद  तालुक्यात रब्बी पिकांचे मोठे नुकसान झाले आहे. दरम्यान, संग्रामपूर तालुक्यातील पिंगळी बु. येथे आर्यन अकबर सुरत्ने या चिमुकल्याच्या अंगावर टीनपत्राचे घर कोसळून तो जखमी झाला, तर लाडनापूर शिवारात ९ मजूर गारपिटीच्या तडाख्यात अडकल्याने जखमी झाले. त्यांच्यावर स्थानिक रुग्णालयात उपचार करण्यात आले असून, त्यांची प्रकृती धोक्याबाहेर असल्याचे रुग्णालयीन सूत्रांनी स्पष्ट केले. घाटाखाली रविवारी सकाळी ७.३0 ते १0.३0 वाजेपर्यंत नांदुरा, संग्रामपूर व जळगाव जामोद तालुक्यात मोठय़ा प्रमाणात गारपीट होऊन नुकसान झाले. कांदा, हरभरा, पान मळ्य़ांचे यात नुकसान झाले. खामगाव तालुक्यातील पिंपळगाव राजा, काळेगाव, माक्तासह खामगाव शहरानजीकच्या परिसरातील पिकांची हानी झाली. दरम्यान, आमदार अँड. आकाश फुंडकर यांनी नुकसानग्रस्त गावांना भेटी देऊन शेतकर्‍यांना धीर दिला.  आमदार डॉ. संजय कुटे यांनीसुद्धा संग्रामपूर तालुक्यातील गावांना भेटी देऊन नुकसानाचा आढावा घेतला. बोरखेड, वारखेड, सगोडा, दानापूर, टुनकी, सायखेड या ठिकाणी गहू, हरभरा, मका, संत्रा आदी पिकांचे नुकसान झाले. नांदुरा तालुक्यातील निमगाव, खामखेड, भुईशिंगा, नारखेड, अवधा आदी ठिकाणी नुकसान झाले. संग्रामपूर तालुक्यातील ९५ गावे गारपिटीमुळे प्रभावित झाल्याचे सांगण्यात येत आहे.

२0१४ ची आठवण रविवारच्या गारपिटीमुळे २0१४ मधील गारपिटीची आठवण होत आहे. बुलडाणा जिल्हय़ात त्यावेळी ४0२ गावात तुफान गारपीट झाली होती. जीवित हानीसह पशुधन हानीही त्यावेळी मोठय़ा प्रमाणावर झाली होती.  त्यावर्षी तब्बल चार वेळा उन्हाळ्य़ात गारपिटीचा तडाखा बसला होता. लोणार तालुक्यातील १७ ते १८ गावे यामध्ये मोठय़ा प्रमाणावर बाधित झाली होती. लोणारच्या सीमावर्ती भागातील एका गावात तर तापमान गारपिटीमुळे शून्य डिग्री सेल्सिअसपर्यंत पोहोचले होते तर बोरखेडी परिसरातील विहिरीत साचलेला गारांचा ढीग तब्बल चार दिवस वितळला नव्हता. जिल्हय़ात १९८५ पासून अवकाळी पाऊस व गारपीट होत असल्याचे पुरावे प्रशासनाकडे आहेत. तत्कालीन जिल्हाधिकारी किरण कुरुंदर यांनी व्यक्तीश: हा मुद्दा हाताळून जिल्हय़ातील हवामान बदलाचा शेतकर्‍यांना फटका बसत असल्याचे दृष्टिपथास आणून दिले.

दोन बहिणींवर पडली वीज; एकीचा मृत्यू, एक गंभीरमोताळा तालुक्यात कापूस वेचण्यासाठी गेलेल्या निकिता गणेश राठोड (१६) आणि नेहा गणेश राठोड (१३) या दोघींवर वीज पडून निकिताचा मृत्यू झाला. नेहावर सध्या बुलडाणा जिल्हा सामान्य रुग्णालयात उपचार करण्यात येत आहेत. रविवारी दुपारी दीड वाजेच्या सुमारास ही घटना घडली. त्यांच्या आईसह इसालवाडी शिवारात त्या कापूस वेचणीसाठी गेल्या होत्या. दीड वाजेच्या सुमारास त्यांच्या अंगावर वीज पडली. त्यामुळे नागरिकांनी त्यांना मोताळा ग्रामीण रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले; मात्र निकिताचा बुलडाणा येथे आणत असताना मृत्यू झाला. नेहा जखमी असून, तिच्यावर सध्या उपचार सुरू आहेत. दरम्यान, बुलडाणा जिल्हय़ात संग्रामपूर आणि देऊळगाव राजात गारपीट आणि वादळी वार्‍याच्या तडाख्यात सापडलेले १२ जण जखमी झाली आहे. नांदुरा तालुक्यातील वसाडी येथे अंगावर झाड पडून खामगाव तालुक्यातील ज्ञानगंगापूर येथील अजय काशीनाथ महाले गंभीर जखमी झाले होते. वसाडी येथील बोडखे यांच्या मळ्य़ाजवळ रस्त्यालगत  असलेले महारुखाचे झाड त्यांच्या अंगावर पडले होते. त्यामुळे त्यांना खामगाव येथील रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले होते; मात्र उपचारादरम्यान त्यांचा मृत्यू झाल्याची माहिती सूत्रांनी दिली.

पाच गुरे दगावली जिल्हय़ातील या ३५६ गावात झालेल्या गारपिटीदरम्यान मेहकर तालुक्यातील समाधान टाले आणि केशव टाले यांच्या दोन वगारी आणि संग्रामपूर तालुक्यातील हमशा फकिरा भारसाकळे (रा. पिंगळी) यांच्या दोन गायी आणि निमखेड येथील संजय खुमकर यांचे बोकूड गारपिटीच्या तडाख्यात आल्याने दगावले.

कृषिमंत्री पांडुरंग फुंडकर यांनी पीक विमा कंपन्यांची बैठक बोलविण्याचे दिले निर्देशविदर्भ, मराठवाड्यासह उत्तर महाराष्ट्रातील काही भागात झालेल्या अवकाळी पावसामुळे तथा गारपिटीमुळे शेतकर्‍यांच्या झालेल्या नुकसानाचा सर्व्हे स्थायी आदेशानुसार त्वरित करण्याबाबतचे निर्देश कृषिमंत्री पांडुरंग फुंडकर यांनी दिले आहेत. दरम्यान, जिल्हा प्रशासनाने सोमवारीच विमा कंपन्यांची बैठक बोलावून गावनिहाय आकडेवारी त्यांना कृषी आणि महसूल विभागाने उपलब्ध करून द्यावी, असे निर्देश दिले आहेत. जेणेकरून नैसर्गिक आपत्तीत शेतकर्‍यांना पीक विम्याचा लगोलग आधार मिळण्यास मदत होईल, असेही त्यांनी स्पष्ट केले. सोबतच राज्यातील अवकाळी पाऊस व गारपिटीचा आढावा तत्परता दाखवत कृषिमंत्र्यांनी घेतला. कृषी विभागाचे अपर मुख्य सचिव विजयकुमार यांच्याशीही या मुद्दय़ावर चर्चा केली. सोबतच ज्या गावांमध्ये गारपीट व अवकाळी पावसामुळे रब्बी हंगामाच्या उभ्या पिकाचे तसेच काढणी पश्‍चात मळणीसाठी ठेवलेल्या धान्याचे नुकसान झाले आहे त्याची त्वरित विमा कंपन्यांना माहिती कळविण्यात यावी, तसेच तीन दिवसात अद्ययावत माहिती उपलब्ध करून विम्याच्या लाभाची किचकट प्रक्रिया शेतकर्‍यांसाठी सहज होईल, अशा पद्धतीने यंत्रणांनी कार्य करावे, असे सांगितले. 

तत्काळ पंचनामे करा - खा. प्रतापराव जाधवबुलडाणा:  नैसर्गिक आपत्तीचा ससेमिरा शेतकर्‍यांच्या मागे लागला असून, खरिपानंतर रब्बीतही अवकाळी पाऊस व रब्बीचा फटका शेतकर्‍यांना बसला आहे. गारपिटीमुळे शेतकर्‍यांचे लाखो रुपयांचे नुकसान झाले असून, गारपीटग्रस्त शेतकर्‍यांचे तत्काळ पंचनामे करण्यात येऊन शेतकर्‍यांना आर्थिक मदत देण्यासाठी त्वरेने पाऊले उचलण्यात यावी, अशी मागणी खा. प्रतापराव जाधव यांनी केली आहे. विशेष म्हणजे शेतकर्‍यांनी प्रशासकीय यंत्रणेकडून स्वत:च्या शेतातील नुकसानाचे पंचनामे करून घेत रीतसर त्याची नोंद घ्यावी, तसेच शिवसेना कार्यकर्त्यांनी शेतकर्‍यांना या कामासाठी मदत करावी, असेही आवाहन शिवसेना जिल्हासंपर्क प्रमुख खा. प्रतापराव जाधव यांनी केले. जिल्ह्यातील बहुतांशभागात गारपिटीने शेतकर्‍यांच्या शेतात उभे असलेले गहू, हरभरा, मका, कांदा यांच्यासह भाजीपालावर्गीय पिकांचे मोठय़ा प्रमाणात नुकसान झाले आहे. फळबागांनाही फटका बसला आहे. आधीच खरिपात बोंडअळीने व भाव मंदीने वैतागलेला शेतकरी पुरता खचला आहे. गारपिटीचा मारा खूप मोठा असल्याने उभी पिके आडवी झाल्याने मदतीची गरज आहे.

६ ते १0 एमएम आकाराच्या गारी संग्रामपूरसह जिल्हय़ातील काही भागात सहा ते दहा एमएम आकाराच्या गारी पडल्याचे काहींचे म्हणणे आहे. त्यामुळे काही शेतमजूरही यामुळे जखमी झालेलेले आहते. प्राथमिक वृत्तानुसार आठ ते दहा मजूर संग्रामपूर तालुक्यात जखमी झाले असल्याचे वृत्त आहे; परंतु जसजशी माहिती आपत्ती व्यवस्थापन विभागास येत आहे तसतसे गारपिटीचे गंभीर स्वरूप समोर येत आहे.

टॅग्स :buldhanaबुलडाणा