लोकमत न्यूज नेटवर्कबुलडाणा: जिल्ह्यातील कोरोना पॉझिटिव्हची रुग्ण संख्या २ हजार ८०० वर गेली आहे. आतापर्यंत ४४ कोरोनाबाधितांचा मृत्यू झाला. जानेफळ येथील डॉक्टर कोरोनाशी झुंज देत असताना औरंगाबाद येथील खाजगी रुग्णालयात उपचारादरम्यान, त्यांचा मृत्यू झाला. जानेफळ येथील ३२ वर्षीय डॉक्टरवर ५ आॅगस्टपासून औरंगाबाद येथील रुग्णालयात उपचार सुरू होते. २८ आॅगस्ट रोजी सकाळी ५ वाजे दरम्यान त्यांचा मृत्यू झाला. डॉक्टरच्या संपर्कातील व दवाखान्यातील इतर कर्मचाऱ्यांचे रिपोर्ट निगेटिव्ह आहेत.बाल रोग तज्ज्ञ म्हणून प्रसिद्ध असलेल्या येथील युवा डॉक्टरला कोरोनाची लक्षणे आढळून आल्यामुळे ५ आॅगस्ट २०२० रोजी ते डॉक्टर स्वत:हून औरंगाबाद येथे उपचारार्थ रवाना झाले होता. तेथे स्वॅब तपासणीनंतर त्याचा रिपोर्ट कोरोना पॉझिटिव्ह आला. त्यांच्या रुग्णालयातील काम करणाºया इतर कर्मचाऱ्यांना सुद्धा तात्काळ मेहकर येथील कोव्हिड सेंटरला पाठविण्यात आले होते. दरम्यान, दवाखान्यातील त्या सर्व कर्मचाºयांचे स्वॅब नमुने घेतल्यानंतर ते निगेटिव्ह आले होते. त्यामुळे त्या डॉक्टरच्या दवाखान्यातील व संपर्कात आलेल्यांना दिलासा मिळाला होता. दरम्यान, २८ आॅगस्ट २०२० रोजी या तरुण डॉक्टरचा उपचार सुरू असताना औरंगाबाद येथील रुग्णालयात मृत्यू झाला. ही माहिती गावात परिसरात सर्वत्र हळहळ व्यक्त होत होती.जानेफळ येथे दुकाने बंद; रस्त्यावर शुकशुकाटमेहकर तालुक्यातील जानेफळ येथे सुरूवातीला कोरोना बाधित एका महिलेचा मृत्यू झाला होता. त्यानंतर पुन्हा डॉक्टरचा कोरोनाने मृत्यू झाला आहे. जानेफळ येथे कोरोनामुळे हा दुसरा मृत्यू आहे. आतापर्यंत येथे २५ पॉझिटिव्ह रुग्ण सापडले असून, त्यापैकी सध्या सहा रुग्णांवर उपचार सुरू आहेत. शुक्रवारी सकाळी ११ ते दुपारी ४ वाजेपर्यंत गावातील संपूर्ण दुकाने बंद ठेवण्याचा निर्णय गावकºयांनी घेतला. त्यामुळे आज गावातील रस्त्यावर शुकशुकाट दिसून आला.
बुलडाणा जिल्ह्यातील डॉक्टरचा कोरोनामुळे औरंगाबादेत मृत्यू
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 28, 2020 1:14 PM