जळगाव जामोद: रविवारी सकाळी जळगाव जामोद तालुक्यात दमदार पाऊस झाला. याही परिस्थितीत नागरिकामध्ये मतदानासाठी उ्त्साह दिसून येत होता. महाराष्ट्राचे कामगार मंत्री तथा बुलडाणा जिल्ह्याचे पालकमंत्री डॉ. संजय कुटे यांनी कुटूंबियासह मतदान केले. याशिवाय काँग्रेस उमेदवार डॉ. स्वातीताई वाकेकर, माजी आमदार कृष्णराव इंगळे, जळगावच्या नगराध्यक्षा सीमाताई डोबे यांनीही मतदानाचा हक्क बजावला. लोकशाहीच्या राष्ट्रीय उत्सवात दिव्यांग आणि वयोवृद्ध मतदारही उत्साहाने मतदानासाठी बाहेर पडले आहेत. सकाळी सात वाजता मतदानाला सर्वत्र शांततेत सुरुवात झाली पाऊस पडत असल्याने मतदान धीम्या पद्धतीने असले तरी उत्साहाने होत आहे. तरुण वयोवृद्ध दिव्यांग तथा महिला मतदानासाठी बाहेर पडले आहेत. मतदान केंद्राबाहेर मतदारांच्या रांगा लागल्या आहेत निवडणूक आयोगाच्या सूचनेनुसार सर्व मतदान केंद्रे आद्यवत असून अधिकारी व कर्मचारी आपापली कर्तव्य बजावत आहेत. या विधानसभा मतदार संघात ३१५ ातदान केंद्रासाठी तब्बल चौदाशे कर्मचारी नियुक्त करण्यात आलेले आहेत. प्रत्येक केंद्रावर चोख पोलिस बंदोबस्त असून स्वयंसेवक दिव्यांग राम मतदारांची ने-आण करीत आहेत. जळगाव शहरात महिलांसाठी सखी मतदान केंद्राची निर्मिती करण्यात आली. हे मतदान केंद्र निवडणुकीचे आकर्षण ठरत आहे. या दरम्यान मतदान केंद्रांवर बाल संगोपनासाठी महिला, वैद्यकीय कीट साठी महिला आणि बी एल ओ तैनात आहेत.
९० वर्षीय वृद्धाचे मतदान जळगाव जामोद तालुक्यातील खेर्डा खुर्द येथील मतदान केंद्रावर आज सकाळी नऊ वाजता रेणुकादास ईटणारे या ९० वर्षीय वयोवृद्ध इसमाने मतदान केले. त्यांना व्हीलचेअरवरून मतदान केंद्रात स्वयंसेवकांनी नेले. दत्तात्रय सुपडा वेरुळकर या दिव्यांग मतदाराने यावेळी मतदान केले. या मतदारांना दे कमालीचा उत्साह दिसून आला. मतदान हा राष्ट्रीय उत्सव असून आम्ही उत्साहाने मतदान करीत असल्याचे यावेळी मतदारांनी सांगितले.