बुलडाणा : तुरीच्या मोबदल्यासाठीे जानेफळ येथील गजानन कृपाळ यांनी जिल्हा उपनिबंधक कार्यालयासमोर सुरु केलेल्या उपोषणाची चौथ्या दिवशी म्हणजे २५ एप्रिल रोजी सांगता झाली. तूर खरेदी केलेल्या शेतमालाचे ३२ कोटी रुपयांचे चुकारे शेतकऱ्यांच्या खात्यात जमा केल्याचे जिल्हा मार्केटींग अधिकाऱ्यांचे पत्र मिळाल्याने हे उपोषण मागे घेण्यात आले. माजी मंत्री डॉ. राजेंद्र शिंगणे यांच्या हस्ते लिंबू पाणी घेऊन उपोषण सोडण्यात आले. शासनाच्या तूर खरेदी केंद्रावर तूर देऊनही बऱ्याच शेतकऱ्यांना चुकारे मिळाले नसल्यामुळे शेतकरी त्रस्त झाले आहेत. गजानन कृपाळ यांनी मेहकर खरेदी - विक्री संघाच्या खरेदी केंद्रावर ९ फेब्रुवारी रोजी २५ क्विंटल तूर दिली होती. परंतु तुरीचा मोबदला मिळाला नव्हता. तब्बल ८५२ शेतकऱ्यांची दोन महिन्यांपूर्वी तूर खरेदी करुन संबंधित विभागाने शासनाकडे पैशांची मागणी मात्र एप्रिल महिन्यात केली. संबंधितावर कारवाई करावी व तुरीचे चुकारे तत्काळ देण्यात यावे या मागणीसाठी गजानन कृपाळ यांनी २२ एप्रिलपासून उपोषण सुरु केले होते. दरम्यान २५ एप्रिल रोजी उपोषणाची सांगता झाली. बुलडाणा जिल्ह्यातील शेतकऱ्यांची तूर खरेदी केलेल्या शेतमालाचे ३२ कोटी रुपये शेतकऱ्यांच्या खात्यात जमा करण्यात आले आहे. तर उर्वरित रक्कम सब एजंट संस्थेकडून लॉट एंट्री व व्हेरिफिकेशन केल्यानुसार शेतकऱ्यांच्या खात्यात वर्ग करण्याची कारवाई सुरु असल्याचे पत्र जिल्हा मार्केटींग अधिकाºयांनी दिल्यामुळे उपोषण मागे घेण्यात आले. यावेळी स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे प्रदेशाध्यक्ष रविकांत तुपकर, जिल्हा उपनिबंधक नानासाहेब चव्हाण, नरेश शेळके, डी. एस. लहाने, अरविंद बापू देशमुख, नारायण पाटील सुसर, गणेश बोचरे, राणा चंदन, बाळासाहेब वानखेडे यांच्यासह मान्यवर उपस्थित होते.
बुलडाणा : तुरीच्या मोबदल्यासाठीच्या उपोषणाची सांगता
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 25, 2018 3:45 PM
बुलडाणा : तुरीच्या मोबदल्यासाठीे जानेफळ येथील गजानन कृपाळ यांनी जिल्हा उपनिबंधक कार्यालयासमोर सुरु केलेल्या उपोषणाची चौथ्या दिवशी म्हणजे २५ एप्रिल रोजी सांगता झाली.
ठळक मुद्देतुरीचे चुकारे तत्काळ देण्यात यावे या मागणीसाठी गजानन कृपाळ यांनी २२ एप्रिलपासून उपोषण सुरु केले होते. ३२ कोटी रुपयांचे चुकारे शेतकऱ्यांच्या खात्यात जमा केल्याचे जिल्हा मार्केटींग अधिकाऱ्यांचे पत्र मिळाल्याने हे उपोषण मागे घेण्यात आले.माजी मंत्री डॉ. राजेंद्र शिंगणे यांच्या हस्ते लिंबू पाणी घेऊन उपोषण सोडण्यात आले.