लोकमत न्यूज नेटवर्कमोताळा: तालुक्यातील राजूर येथील अवैध गर्भपात प्रकरणात बोराखेडी पोलिसांनी अटक केलेल्या चार आरोपींच्या पोलीस कोठडीत आणखी दोन दिवसांची २६ डिसेंबर रोजी वाढ करण्यात आली. प्रारंभी या आरोपींना मंगळवारपर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात आली होती. दरम्यान, मंगळवारी त्यांना न्यायालयात हजर केले असता न्यायालयाने ही वाढ केली.तालुक्यातील राजूर येथे बीड जिल्ह्यातील एका विवाहितेचा बेकायदेशीर गर्भपात करण्यात आला होता. त्यापूर्वी तिचे परराज्यात गर्भलिंग निदान करण्यात आल्याचे उघड झाले आहे. या प्रकरणात बोराखेडी पोलिसांनी गुन्हा दाखल करून वैद्यकीय अहर्ता नसलेल्या ब्रिजलाल सुपडा चव्हाण (५0 रा. गुळभेली, ता. मोताळा), डॉ. सैय्यद आबिद हुसेन सैय्यद नजीर (४९, रा. बुलडाणा), गर्भपात करणारी विवाहिता व तिचा पती किशोर सुदामराव चाळक (२९, रा. किनगाव, ता. गेवराई, जि. बीड) या चार जणांना अटक केली होती. त्यांना २६ डिसेंबरपर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात आली होती. दरम्यान, बोराखेडी पोलिसांनी मंगळवारी त्यांना मलकापूर येथील न्यायालयात हजर केले असता, न्यायालयाने त्यांच्या पोलीस कोठडीत दोन दिवसांची वाढ केली आहे. पुढील तपास बोराखेडीचे पोलीस निरीक्षक अविनाश भामरे करीत आहेत. बुलडाणा जिल्हय़ात गेल्या एक महिन्यात गर्भपातासंदर्भातील तीन घटना उघडकीस आल्या आहेत. त्यातल्या त्यात मोताळा तालुक्यात लागोपाठ दोन प्रकरणे उघडकीस आली असून, परराज्यात त्याचे धागेदोरे असल्याने हे प्रकरण पोलीस प्रशासन व शासकीय यंत्रणेने गंभीरतेने घेतले आहे. राजूर प्रकरणात आरोपींच्या पोलीस कोठडीत वाढ करण्यात आली असून, पोलिसांना ते काय माहिती देतात, याकडे लक्ष लागून आहे.
बुलडाणा : मोताळा तालुक्यातील अवैध गर्भपात प्रकरण; आरोपींच्या कोठडीत वाढ
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 27, 2017 1:24 AM
मोताळा: तालुक्यातील राजूर येथील अवैध गर्भपात प्रकरणात बोराखेडी पोलिसांनी अटक केलेल्या चार आरोपींच्या पोलीस कोठडीत आणखी दोन दिवसांची २६ डिसेंबर रोजी वाढ करण्यात आली. प्रारंभी या आरोपींना मंगळवारपर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात आली होती. दरम्यान, मंगळवारी त्यांना न्यायालयात हजर केले असता न्यायालयाने ही वाढ केली.
ठळक मुद्देबेकायदा गर्भपात प्रकरण