लोकमत न्यूज नेटवर्कमोताळा (बुलडाणा ): शेतातून ट्रॅक्टर नेण्यास मनाई करणाऱ्यास तिघांनी कुऱ्हाड व लोखंडी सळईने मारहाण करून जखमी केल्याची घटना शनिवारी १७ फेब्रुवारी रोजी दुपारी मूर्ती शिवारात घडली. याप्रकरणी बोराखेडी पोलिसांनी तीन जणांविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.तालुक्यातील मूर्ती येथील शिवनाथ भिका धंदरे (६५) यांनी बोराखेडी पोलिस ठाण्यात तक्रार दिली की, शनिवारी दुपारी गावातीलच पद्माकर भास्कर धुरंधर, पवन हरिभाऊ धुरंधर, नंदू हरिभाऊ धुरंधर हे तिघे जण फिर्यादीच्या शेतातून नांगरणीसाठी ट्रॅक्टर घेऊन जात होते. शिवनाथ धंदरे यांनी त्यांना आपल्या शेतातून ट्रॅक्टर नेण्यास मनाई केल्याच्या कारणावरून उपरोक्त तिघांनी संगनमत करून फिर्यादीला कुऱ्हाड व लोखंडी सळईने मारहाण करून जखमी केले. तसेच शिवीगाळ करून जीवे मारण्याची धमकी दिल्याचे तक्रारीत नमूद आहे. या प्रकरणी शिवनाथ धंदरे यांच्या तक्रारीवरून बोराखेडी पोलिसांनी उपरोक्त तीन जणांविरुद्ध विविध कलमान्वये गुन्हा दाखल केला आहे. पुढील तपास एएसआय विनोद शिंदे व सुरळकर करीत आहेत.
बुलडाणा : शेतातून ट्रॅक्टर नेण्यास मनाई केल्याने घातले कु-हाडीचे घाव!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 17, 2018 9:57 PM
मोताळा (बुलडाणा ): शेतातून ट्रॅक्टर नेण्यास मनाई करणाऱ्यास तिघांनी कुऱ्हाड व लोखंडी सळईने मारहाण करून जखमी केल्याची घटना शनिवारी १७ फेब्रुवारी रोजी दुपारी मूर्ती शिवारात घडली. याप्रकरणी बोराखेडी पोलिसांनी तीन जणांविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.
ठळक मुद्देबुलडाणा तालुक्यातील मुर्ती शिवारातील घटनामारहाण करणा-या तिघांविरुद्ध बोराखेडी पोलिसांत गुन्हा दाखल