लोकमत न्यूज नेटवर्कबुलडाणा: जिल्ह्यात चार दिवसापासून संचारबंदी लागू झाली असून या कालावधीत जिल्ह्यात जवळपास २७ हजार ४४३ व्यक्ती दाखल झाल्या असून त्यापैकी २० हजार नागरिकांची आतापर्यंत आरोग्य विभागाकडून तपासणी करण्यात आली असून पैकी काहींना खबरदारीचा उपाय म्हणून होम क्वारंटीनमध्ये राहण्याचा सल्ला देण्यात आला असल्याची माहिती आरोग्य विभागातील सुत्रांनी दिली. आहे. दरम्यान, या संख्येमध्ये येत्या दोन ते तीन दिवसामध्ये आणखी वाढ होण्याची शक्यता आहे.बुलडाणा जिल्ह्यात आतापर्यंत विदेशातून आलेले व संशयीत वाटल्यामुळे जवळपास ८५ जणांना हॉस्पीटल क्वारंटीन आणि आयासोलेशन कक्षासह घरातच होम क्वारंटीनमध्ये राहण्याचा सल्ला देण्यात आला होता. पैकी आतापर्यंत ११ जणांचे पाठविण्यात आलेल स्वॅब नमुनेही तपासणीअंती निगेटीव्ह निघाले आहेत.
तालुकानिहाय आकडेवारीबुलडाणा तालुक्यात ८२२, चिखलीमध्ये ११६०, सिंदखेड राजामध्ये २३४०, मेहकरमध्ये तीन हजार, लोणारमध्ये एक हजार ५००, खामगावमध्ये पाच हजार ५००, शेगावमध्ये एक हजार ५००, जळगाव जामोद मध्ये एक हजार ६००, संग्रामपूरमध्ये एक हजार ३००, नांदुऱ्यामध्ये एक हजार ५००, मलकापूरमध्ये एक हजार ७००, मोताळ््यात तीन हजार ५०० च्या आसपास नागरिक पुणे, मुंबईसह अन्य शहरातून दाखल झालेले आहेत.जिल्हा परिषदेचा जिल्हास्तरावरील नियंत्रण कक्ष आणि तालुकास्तरावरील नियंत्रण कक्षाच्या माध्यमातून गेल्या तीन दिवसात उपरोक्त माहिती संकलीत करण्यात आली . थेट आशा वर्कस, आरोग्य विभागाचे कर्मचारी मिळून गावांमध्ये घरोघरी जावून याची चौकशी करीत आहेत.