ठळक मुद्देसोमवारपासून हा मार्ग सुरू करण्यात आला. परवानगी नसल्याने हा रस्ता बंद करण्यात आला होता.
लोकमत न्यूज नेटवर्क खामगाव : बुलडाणा - बोथा - खामगाव मार्ग ३० जानेवारी ते २८ फेब्रुवारीदरम्यान ३० दिवस बंद ठेवण्यात आला होता. सोमवारपासून हा मार्ग सुरू करण्यात आला. विदर्भाची वनपंढरी म्हणून ओळख असलेल्या ज्ञानगंगा अभयारण्यातून जाणाऱ्या रस्त्याच्या नूतनीकरण व मजबुतीकरणाच्या कामाला मान्यता मिळाली. या जंगलातील रस्त्याचे काम करायचे असल्याने तसेच वाहनांना खाली उतरवून वनविभागाच्या हद्दीतून जाण्यास परवानगी नसल्याने हा रस्ता बंद करण्यात आला होता. ३० जानेवारी ते २८ फेब्रुवारी दरम्यान हा मार्ग बंद करून वाहतुक वळवण्यात आली हाेती.