- नीलेश जोशी लोकमत न्यूज नेटवर्कबुलडाणा: सातत्याने अवर्षणाचा फटका सहन करणाऱ्या बुलडाणा जिल्ह्यातील शेतकऱ्यांना यंदा ओल्या दुष्काळाने सतावल्याचे स्पष्ट होत असून जिल्ह्यातील अंतिम पैसेवारी ही अवघी ४३ पैसे आली आहे. ५० पैशाच्या आत ती असल्याने शेतकºयांच्या आणखी काही नुकसान भरपाई मिळण्याच्या आशा पल्लवीत झाल्या आहेत.चालू दशकात २०१३-१४ या वर्षाचा अपवाद वगळता जिल्ह्यात सातत्याने अवर्षणाची स्थिती आहे. त्यात यावर्षी पावसाने चांगली हजेरी लावली होती. मात्र परतीचा व अवकाळी पावसामुळे चांगले उत्पादन होण्याच्या पल्लवीत झालेल्या शेतकºयाच्या आशेवर पाणी फेरले होते. जिल्ह्यातील सहा लाख ४९ हजार ३५१ शेतकºयांना परतीच्या पावसाचा फटका बसला आहे. जिल्ह्यात या पावसामुळे ५५९ कोटी ६४ लाख रुपयांपेक्षा अधिक रकमेचे शेतकºयांचे नुकसान झाले आहे. त्यामुळे शेतकºयांना त्वरनेने नुकसान भरपाई देण्याची मागणी होत होती. दरम्यान राज्य शासनाने यापैकी १३६ कोटी १३ लाख रुपये पहिल्या टप्प्यात जिल्ह्याला दिले होते. त्याच्या वाटपानंतर जिल्ह्याला दुसºया टप्प्यात जिल्ह्याला २९७.४८ कोटी रुपये मिळाले होते. त्याची सध्या तालुकास्तरावरून थेट शेतकºयांच्या खात्यात जमा करण्याची प्रक्रिया सुरू आहे. अद्यापही जिल्ह्याला १२६ कोटी रुपयांची प्रतीक्षा आहे.अशातच जिल्ह्याची अंतिम पैसेवारी ही फक्त ४३ पैसे आल्यामुळे ओल्या दुष्काळावर एकप्रकारे शिक्कामोर्तबच झाले आहे. दुष्काळ जाहीर करण्याच्या नव्या निकषामुळे यात काही प्रसंगी काही अडचणीही येण्याची शक्यता नाकारता येत नाही. अंतिम पैसेवारी ही ५० पैशाच्या आत आली आहे. ३० सप्टेंबर रोजी जिल्ह्याची अंतिम पैसेवारी जाहीर झाली होती. ती त्यावेळी ७२ पैसे आली होती. मात्र त्यानंतर आॅक्टोबर व नोव्हेंबरमध्ये पावसाने कहर केला होता. त्यातच ३१ आॅक्टोबरला जाहीर झालेली सुधारीत पैसेवारी ही ६९ पैसे आली होती. खरीपामध्ये जिल्ह्यात यावर्षी सात लाख ३९ हजार ८६७ हेक्टरवर पेरा झाला होता. आॅक्टोबर व नोव्हेंबर महिन्यात आलेल्या परतीच्या व अवकाळी पावसामुळे हातोंडाशी आलेले पिक हातून गेले.
बुलडाणा: खरीप अंतीम पैसेवारी ४३ पैसे
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 01, 2020 2:16 PM