लोकमत न्यूज नेटवर्कबुलडाणा : तालुक्यात दिवसेंदिवस पाणीटंचाईची दाहकता वाढतच आहे. देऊळघाट येथे पाणी पुरवठा करणारी येळगाव येथील विहीर अटली असून त्याचे खोलीकरणाचे काम सुरु आहे. त्यामुळे येथे पाणीटंचाई निर्माण झाली आहे. सध्या विकतच्या पाण्यासाठीही महिलांना रांगा लावाव्या लागत आहेत.जनतेला पाणी भेटावे म्हणून ग्राम पंचायतने सरकारी टँकर सुरु करण्यासाठी प्रस्ताव तयार केला; पण अधिग्रहणसाठी विहिरच भेटत नसल्याने जनतेला अजुन पणी टंचाईला किती दिवस समोर जावावे लागणार, हा प्रश्न उपस्थित होत आहे. २४ ते २५ हजार लोकसंख्या असलेल्या देऊळघाटला दरवर्षी भीषण पाणी टंचाईचा सामना करावा लागतो. कायम स्वरूपी नळ योजना नसल्याने दुर शेतातून किंवा मिळेल तेथून पाणी विकत घ्यावे लागते. मागील वर्षी आमदार हर्षवर्धन सपकाळ यांच्या प्रयत्नाने नवीन पाणी पुरवठा योजना मंजूर झाली व त्यामुळे येळगाव धरणाच्या बुडित क्षेत्रात नवीन विहीर खोदुन नवीन पाइपलाइन टाकण्यात आली. गावात तीन ठिकाणी सामूहिक नळ लावण्यात आले. त्या नळावरुण लोक पाणी घ्यायचे. मागील १५ दिवस अगोदर या विहिरीतले पाणी अटले म्हणून त्याचे खोलिकरणचे काम ग्राम पंचायतच्या वतीने सुरु करण्यात आले.इतर कोणतेही जलस्रोत नसल्याने गावात भीषण टंचाई निर्माण झाली व ती बघून शासना कडून टँकरची मागणी करण्यासाठी ग्राम पंचायतने प्रस्ताव तयार केला आहे. सोबत ज्या विहिरितून पाणी आणायचे त्या विहीर मालकाचा सात बारा प्रस्ताव सोबत जोडावा लागतो त्या करिता सरपंच गजनफर खान यांनी तालुक्यातील बरेच विहीर शोधले पण पाणी नसल्याने एकही विहीर पाणी पुरवठ्यासाठी अधिग्रहित करण्यासाठी भेटली नाही. येळगाव धरणातील विहिरीचे खोलीकरणचे काम सुरु असल्याने जनतेला पाणी उपलब्ध व्हावे म्हणून अधिग्रहण साठी विहीर शोधत असल्याची माहिती देऊळघाट येथील सरपंच गजनफर खान यांनी दिली.उंद्री येथे टँकर बंद उपोषणाचा इशाराअमडापूर: उंद्री येथे सुरू असलेले टँकर बंद केल्याने गावकऱ्यांवर पाणीटंचाईचे संकट निर्माण झाले आहे. पाणीटंचाईची समस्या सोडवण्यासाठी सरपंच प्रदीप अंभोरे यांनी जिल्हाधिकाऱ्यांकडे निवेदनाद्वारे उपोषणाचा इशारा दिला. उंद्री गावास पाणी पुरवठा करण्यासाठी विहीर बोरवेल अधिग्रहण करण्यात यावे, टँकरद्वारे मोफत पाणी पुरवठा करण्यात यावा, गावासाठी कायम स्वरूपी पाणीपुरवठा करण्यासाठी नवीन पाइपलाईन मंजूर करावी, अशी मागणी सरंपच प्रदीप अंभोरे यांनी केली आहे.
बुलडाणा : विकतच्या पाण्यासाठीही रांगा!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 09, 2019 2:38 PM