लोकमत न्यूज नेटवर्कबुलडाणा : नागरीकरणाचा वाढता वेग पाहता बुलडाणा पालिकेवर लगतच्या पाच गावांतील पायाभूत व नागरी सुविधांचा वाढता बोजा पाहता शहरालगतच्या येळगाव, माळविहीर, सावळा, सुंदरखेड, जांभरून, हनवतखेड या गावांचा समावेश बुलडाणा पालिकेत करण्यासंदर्भातील हालचालींनी वेग घेतला आहे. त्यासंदर्भाने बुलडाण्याचे आमदार संजय गायकवाड यांनी आनुषंगिक नकाशा अंतिम करण्यात आला असल्याची माहिती दिली आहे. यापूर्वी २०१२ मध्ये पालिकेच्या सर्वसाधारण सभेमध्ये आनुषंगिक प्रस्तावस मान्यता देण्यात आली होती. त्यानंतर व्यापक हालचाली झाल्या होत्या. या गावातील लोकसंख्या, नकाशे अधिकाऱ्यांचे अभिप्राय, या ग्रामीण भागातील गावांतील नागरीसुविधांचा पालिकेवर पडणारा बोजा हे मुद्दे विचारात घेण्यात येऊन विभागीय आयुक्तांकडे त्यावेळी प्रस्ताव पाठविण्यात आला होता. सोबतच १५ जानेवारी २०१३ रोजी नगरविकास विभागाच्या प्रधान सचिवांशीही पालिकास्तरावर पत्रव्यवहार झाला होता. मात्र पालिकेच्या नकाशामध्ये शहरातील विस्तारित भागासह अन्य काही भागांच्या नकाशातील त्रुटी पाहता हा प्रस्ताव दुरुस्त करून पाठविण्याच्या सूचना देण्यात आल्या होत्या. त्या आनुषंगाने आता पुन्हा नव्याने हालचाली सुरू झाल्या आहेत. विस्तारित नकाशात काही गटक्रमांक सापडत नव्हते. त्यामुळे समस्या होती.
बुलडाणा नगरपालिकेच्या हद्दवाढीच्या हालचाली
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 20, 2020 11:45 AM
येळगाव, माळविहीर, सावळा, सुंदरखेड, जांभरून, हनवतखेड या गावांचा समावेश बुलडाणा पालिकेत करण्यासंदर्भातील हालचालींनी वेग घेतला आहे.
ठळक मुद्देआनुषंगिक नकाशा अंतिम करण्यात आला असल्याची माहिती दिली आहे. सर्वसाधारण सभेमध्ये आनुषंगिक प्रस्तावस मान्यता देण्यात आली होती.