- हर्षनंदन वाघबुलडाणा : मुख स्वास्थ हे सर्व शारिराच्या स्वास्थाचे गणक आहे. त्याचप्रमाणे स्वास्थ जर व्यवस्थित ठेवले तर पुढील अनेक आजारापासून आपण वाचू शकतो. यासाठी आरोग्य विभागामार्फत ३ ते १७ फेबु्रवारी दरम्यान मौखिक आरोग्य तपासणी मोहीमेचा दुसरा टप्पा सुरू करण्यात आला आहे. यावेळी पहिल्या टप्प्यात तपासणी करण्यात आलेल्या ३ लाख ६५ हजार ३९६ रूग्णांपैकी काही रूग्णांची फेरतपासणी करून ३३६ संशयीत रूग्णांची बायोप्सी करण्यात येणार आहे.आरोग्य विभागातर्फे १ ते ३१ डिसेंबर या कालावधीत विशेष मौखिक आरोग्य तपासणी मोहीम राबविण्यात आली होती. या कालावधीत जिल्ह्यातील ३० वर्षावरील ३ लाख ६५ हजार ३९६ व्यक्तींची विशेष तपासणी करण्यात आली. जिल्ह्यात जिल्हा आरोग्य अधिकारी यांच्या मार्फत ग्रामीण भागात व जिल्हा शल्य चिकित्सक यांच्या मार्फत शहरी भागात मौखिक आरोग्य तपासणी सोबत मौखिक आरोग्य कसे राखावे, कर्करोगास प्रतिबंध, तंबाखूचे दुष्परिणाम व लवकर निदानासाठी तपासणी करण्याबाबत लोकांना माहिती देण्यात आली. या मोहिमेदरम्यान ग्रामीण भागातील नागरिकांना जिल्ह्यातील एकूण ५२ प्राथमिक आरोग्य केंद्र, १४ ग्रामीण रूग्णालय तसेच शहरी भागातील नागरिकांसाठी नगरपालिकेअंतर्गंत येणाºया ३ दवाखाने, ३ उपजिल्हा रूग्णालय व १ जिल्हा सामान्य रूग्णालयामार्फत मौखिक आरोग्याबाबत सेवा देण्यात आली. या मोहिमेदरम्यान डिसेंबर महिन्याच्या पहिल्या आठवड्यात १ ते ९ डिसेंबर दरम्यान ५५ हजार ३०८ व्यक्तींची तपासणी करण्यात आली, दुसºया आठवड्यात १० ते १६ डिसेंबर दरम्यान १ लाख २२ हजार ९३, तिसºया आठवड्यात १७ ते २३ डिसेंबर दरम्यान ९३ हजार ४०२ व चवथ्या आठवड्यात २४ ते ३१ डिसेंबर दरम्यान ९४ हजार ५९३ व्यक्तींची तपासणी करण्यात आली. अशा प्रकारे शहरी भागातील एकूण ४१ हजार ८६६, ग्रामीण भागातील ३ लाख २३ हजार ५३० व्यक्तींची मौखिक आरोग्य तपासणी करण्यात आली. या मोहिमेचा दुसरा टप्पा जागतिक कर्करोग दिनानिमित्त आयोजित कर्करोग जागृती पंधरवड्यात पाहिल्या टप्प्यात मौखिक तपासणी करण्यात आलेल्या काही रूग्णांची फेरतपासणी करून संशयीत ३३६ रूग्णांची बायोप्सी करण्यात येणार आहे.याठिकाणी करण्यात येणार रूग्णांची बायोप्सी४जागतिक कर्करोग दिनानिमित्त ३ ते १७ फेब्रुवारी दरम्यान कर्करोग जागृती पंधरवड्यात संशयीत रूग्णांची बायोप्सी जिल्ह्यातील ५ ठिकाणी करण्यात येणार आहे. त्यात जिल्हा सामान्य रूग्णालय बुलडाणा, ग्रामीण रूग्णालय चिखली, प्राथमिक आरोग्य केंद्र नांदूरा, ग्रामीण रूग्णालय सिंदखेड राजा, सामान्य रूग्णालय खामगाव व उपजिल्हा रूग्णालय शेगाव या ठिकाणी जनरल सर्जन डॉ.आशिष गायकवाड, आरोग्य तज्ञ डॉ.सुनिल राजस, आरोग्य सहाय्यक मलिक खान, दंत आरोग्य तज्ञ नम्रता बेन, दंत आरोग्य यांत्रिकी चेतन महाजन आदी पथकातील टीमचे सदस्य संशयीत रूग्णांची बायोप्सी करणार आहेत.
बायोप्सी म्हणजे काय ?४ बायोप्सी म्हणजे आपल्याला आजाराचा संशय असलेल्या शरीराच्या कोणत्याही अवयवाचा तुकटा काढून त्याचे प्रयोग शाळेत निदान करण्यात येते. काही वेळा शरीराच्या आतील भागातील अवयवाविषयी संशय असल्यास नाक किंवा तोंडाव्दारे नळी टाकून शरिराच्या आतील संयशीत अवयवाचा तुकटा काढून प्रयोग शाळेत पुढील तपासणी करण्याकरीता पाठविण्यात येतो. या प्रक्रियेत शरिराच्या संशयीत अवयवास कोणता आजार झाला आहे, किती प्रमाणात आहे, त्यावर कोणती शस्त्रक्रिया किंवा औषधोपचार करावा, याबाबत वैद्यकीय अधिकाºयांना निर्णय घेण्यासाठी मदत होत असते.