शहरं
Join us  
Trending Stories
1
आधी सिंधू करार मोडला, आता पाकिस्तानच्या वरिष्ठ राजदूताला बोलावले, आणखी एक मोठी कारवाई
2
'माझ्या मुलाला कसं सांगू की त्याचे वडील आता परत येणार नाहीत', महिलेने विमानतळावर पोहोचताच फोडला टाहो
3
धर्म विचारून गोळी झाडण्याची ही काही पहिलीच वेळ नाही; याआधी कधी घडली होती घटना?
4
ना अदानी, ना अंबानी; 'या' भारतीय अब्जाधीशानं आतापर्यंत केली सर्वाधिक कमाई
5
पहलगाम हल्ल्यानंतर भारताचा पाकवर कायदेशीर स्ट्राईक; पाकिस्तानची आज बैठक
6
Ather Energy चा IPO येणार, निश्चित झाला प्राईज बँड; 'या' तारखेपासून करता येणार गुंतवणूक, पाहा डिटेल्स
7
आजचे राशीभविष्य, २४ एप्रिल २०२५: नोकरदारांना आजचा दिवस शुभ आहे
8
जम्मू-काश्मिरात अडकलेल्या पर्यटकांचे पहिले विमान आज मुंबईत येणार; ८३ जणांमध्ये कोणा-कोणाचा समावेश?
9
१५,००० जणांनी कॅन्सल केलं काश्मीरचे विमान तिकीट; पहलगाम हल्ल्यानंतर पर्यटनाचा बेत रद्द
10
Pahalgam Terror Attack: भारत झुकणार नाही, कुणालाही सोडणार नाही; गृहमंत्री अमित शाह यांचा इशारा
11
हादरलेल्या काश्मीरमध्ये आजही महाराष्ट्र, गुजरातचे २०,००० पर्यटक; हॉटेलमध्ये मुक्काम
12
धर्मादाय रुग्णालयांवर आता तपासणी पथकाचा वॉच; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे निर्देश
13
आम्ही आमच्या देशात सुरक्षित आहोत का?; डाेंबिवलीकरांचा संंतप्त सवाल
14
अजूनही पर्यटकांची पहिली पसंती काश्मीरलाच; हल्ल्याचा परिणाम तात्पुरता, सर्व सुरळीत होण्याची आशा
15
‘जशास तसे’ व ‘लक्षात राहील’ असे उत्तर देणे; पाकिस्तानला धडा शिकवावा लागेलच, पण...
16
‘आपल्या’ इतकाच राग, तितकेच दु:ख ‘त्यांना’ही आहे; १९ वेळा दहशतवाद्यांनी मला उचलून नेले
17
स्वीडनमधील हे जोडपं देश सोडून पळालं, मात्र जाताना १५८ पिंप मानवी विष्ठा मागे ठेवले
18
Pahalgam Terror Attack: मॅच आधी खेळाडूंनी दहशतवादी हल्ल्यातील मृत पर्यटकांना वाहिली श्रद्धांजली
19
काश्मीरला जाण्यासाठी अनेक महिने पैसे साठवले; आनंद, स्वप्न पूर्ण करायला गेले अन् घात झाला 
20
पहलगाम हल्ला: २४ तासांनंतर बांगलादेशची पहिली प्रतिक्रिया आली; मोहम्मद युनूस म्हणाले...

बुलडाणा : सातपुड्यात आदिवासींचा ‘फगवा उत्सव’; लोकप्रतिनिधीही झाले सहभागी!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 5, 2018 00:45 IST

जळगाव जामोद : सातपुड्याच्या कुशीत वसलेले आदिवासी आपल्या  पारंपरिक, धार्मिक उत्सव तथा चालीरितीचे जतन करतात आणि त्यातून  जीवनाचा आनंद शोधतात. अशा या जगावेगळ्या लोकांचे सण, उ त्सवही वेगळेच असतात. हिंदू संस्कृतीला धरुन असणार्‍या सर्व धार्मिक  परंपरेत त्यांच्यामते फगवा उत्सव हा अतिशय महत्त्वाचा सण मानला  जातो. यासाठी तब्बल पाच दिवस ते आपली कामे सोडून फगव्यात मग्न  असतात. 

ठळक मुद्देसातपुड्याच्या कुशीतील आदिवासींचा आनंदोत्सव

जयदेव वानखडे । लोकमत न्यूज नेटवर्कजळगाव जामोद : सातपुड्याच्या कुशीत वसलेले आदिवासी आपल्या  पारंपरिक, धार्मिक उत्सव तथा चालीरितीचे जतन करतात आणि त्यातून  जीवनाचा आनंद शोधतात. अशा या जगावेगळ्या लोकांचे सण, उत्सवही वेगळेच असतात. हिंदू संस्कृतीला धरुन असणार्‍या सर्व धार्मिक  परंपरेत त्यांच्यामते फगवा उत्सव हा अतिशय महत्त्वाचा सण मानला  जातो. यासाठी तब्बल पाच दिवस ते आपली कामे सोडून फगव्यात मग्न  असतात. यावर्षीही आदिवासी ग्राम उमापूर, काळमाटी, भिंगारा, चारबन, हनव तखेड, रायपूर, गारपेठ, निमखेडी, आदी गावांमध्ये हा फगवा उत्सव  मोठय़ा उत्साहात साजरा होत आहे. आपल्या पारंपरिक वाद्यांसह पारं परिक नृत्याने हे आदिवासी शहरवासीयांची मने वेधताना दिसतात.  जळगाव शहराच्या उत्तरेस सातपुड्याच्या पर्वत रांगांमध्ये आदिवासींची  गावे आहेत. या उत्सवाला हे आदिवासी शहरात येऊन भंगर्‍या मागतात  आणि फगवा गोळा करून नेतात.यंदा उमापूर आणि कालमाटी येथील फगवा उत्सवातील आदीवासी  शहरात वेगवेगळ्या वेशभुषा करुन आणि महिला नृत्य करुन अन्नधान्य  व देणगी गोळा करीत आहे. होळी पेटल्यानंतर दुसर्‍या दिवसापासून चार  दिवस गावागावात फिरुन आणि मोठमोठे ढोल वडवून घुंगरांच्या  तालावर थिरकत थिरकत आपल्या आदीवासी नृत्यकलाची  अविष्काराचे प्रदर्शन करतात. त्यानंतर त्यांच्या गावामध्ये ही अन्नधान्य  गोळा करतात. हे करत असताना कुणावरही त्यांची जबरदस्ती नसते.  प्रेमाणे जे दिले ते घ्यायचे याप्रमाणे जेवढे अन्नधान्य व पैसा अडका जमा  होता त्यामध्ये पाचव्या दिवशी गावामध्ये मोठा भंडारा केला जातो. यावर्षी  हा कार्यक़्रम ६ मार्च रोजी होणार असल्याचे सांगितले.काबाड कष्ट करुन जिवन जगणार्‍या आदीवासीच्या जीवनात हा उत्सव  मोठा आनंद निर्माण करतो. बायका मुले, म्हातारी माणसे मोठय़ा उ त्साहाने यात सहभाग होतात. 

आमदार हर्षवर्धन सपकाळांचाही सहभागसंग्रामपूर व जळगाव जामोद तालुक्यातील सातपुड्यातील पर्वतराजीत  पारंपरिक रहिवाशी असलेल्या आदिवासी बांधवांच्या फगवा या होळीनं तर ८ दिवस साजरा होणार्‍या उत्सवाचे चालठाना येथे आयोजन  करण्यात आले होते. या पारंपरिक उत्सवात आमदार हर्षवर्धन सपकाळ  हे आज सहभागी झाले. यावेळी सर्व आदिवासी समाज बांधवांनी  प्रवेशद्वारापासून वाजत गाजत आमदार हर्षवर्धन सपकाळ यांचे स्वागत  केले.

आदिवासी लोकांना परंपरा जिवंत राहावी, यातून लोकांचे निखळ  मनोरंजन व्हावे आणि आदिवासी बांधवांमधील एकोपा कायम रहावा,  यासाठी आम्ही काही ठरावीक मंडळी स्वत: पुढाकार घेऊन फगवा उ त्सव मोठय़ा उत्साहाने साजरा करतो. - -केशवसिंग राऊत  शिक्षक उमापूर 

टॅग्स :Holi 2018होळी २०१८Jalgaon Jamodजळगाव जामोद