नीलेश जोशी। लोकमत न्यूज नेटवर्कबुलडाणा : २0१९ मध्ये होणार्या लोकसभा निवडणुकीसाठी स्वाभिमानी शे तकरी संघटनेने तयारी सुरु केली असून माढा लोकसभा मतदारसंघातून मुळचे बुलडाण्याचे असलेले वस्त्रोद्योग महामंडळाचे माजी अध्यक्ष रविकांत तुपकर यांना उमेदवारी मिळण्याचे संकेत मिळत आहेत. शनिवारी पंढरपूरनजीक स्वाभीमानी शेतकरी संघटनेचे सर्वेसर्वा खासदार राजू शेट्टी यांच्या उपस्थितीत कार्यकर्त्यांचा मेळावा पार पडला. यावेळी माढा लोकसभा मतदारसंघातील संभाव्य उमेदवाराचीही चर्चा करण्यात आली. यावेळी रविकांत तुपकर हे सर्वसमावेशक उमेदवार ठरतील अशी भावना कार्यकर्त्यांनी व्यक्त केली.माढा लोकसभा मतदार संघात २0१४ च्या निवडणुकीदरम्यान रविकांत तुपकर यांनी संपूर्ण मतदार संघ पिंजून काढला होता. सांगोला, करमाळा, माढा, पंढरपूर तालुक्याचा अर्धा भाग, माळशिरस, मान, खटाव, फलटण या भागात तुपकर यांचा एक आक्रमक युवा नेता अशी ओळख आहे. स्वाभिमानीच्या प्रचाराची सं पूर्ण धुरा यांनी अत्यंत प्रभावीपणे सांभाळताना तळागाळातील कार्यकर्त्यांंशी संवाद साधला होता. ऊस दरवाढ आंदोलनात तुपकर यांनी आक्रमक नेतृत्व करताना शेतकर्यांच्या बाजून निर्णय घेण्यास भाग पाडले होते. यामुळे ते सामान्य कार्यक र्त्यांमध्ये चांगलेच रुळले होते. गतवेळी अवघ्या २८ हजार मतांनी त्यावेळी स्वाभिमानीचे उमेदवार सदाभाऊ खोत पराभूत झाले होते.
खा. शेट्टीचे कट्टर सर्मथकस्वाभिमानी शेतकरी संघटनेचे विदर्भात जाळे विणण्याचे काम रविकांत तु पकरांनी चांगल्या प्रकारे केले आहे. खा. शेट्टी यांचे सर्मथक असलेल्या तु पकरांना राज्यमंत्रीपदाचा दर्जा असलेले वस्त्रोद्योग महामंडळाचे अध्यक्षपदही मिळाले होते. खा. शेट्टी यांनी महायुतीमधून बाहेर पडण्याचा निर्णय घेतल्यानंतर तुपकर यांनी ‘लाल दिवा’ सोडून खा. शेट्टींच्या खांद्याला खांदा लावून काम करण्याचा निर्णय घेतला होता. त्यांना गळाला लावण्याचे प्रयत्नही सत्ताधारी पक्षा तील काही नेत्यांनी केले होते. परंतु त्यांनी स्वाभिमानीसोबतच राहण्याचा निर्णय घेतला होता, हे विशेष.
सक्षम पर्याय!कृषी राज्यमंत्री पद मिळाल्यानंतर खा. शेट्टी व सदाभाऊ खोत यांच्यात बेबनाव झाला होता. शेतकर्याच्या प्रश्नावर संघटनेने महायुतीमधून बाहेर पडण्याचा निर्णय घेतल्यानंतर खोत मंत्रीपदावर कायम होते. अखेर संघटनेने त्यांना पक्षातून काढले होते. आगामी निवडणुकीत संघटनेतेतर्फे रविकांत तुपकर हेच सक्षम पर्याय असल्याचे बोलले जाते.
योग्य व सक्षम उमेदवार आम्ही माढा लोकसभा मतदार संघात देणार आहोत. यामध्ये आमच्यासमोर काही पर्याय असले तरी रविकांत तुपकर यांच्या नावाचा प्रामुख्याने विचार करीत आहोत. बुलडाणा लोकसभा मतदारसंघाच्या दृष्टीनेही आमची तयारी आहे.- राजू शेट्टी, खासदार, स्वाभीमानी शेतकरी संघटना