लोकमत न्यूज नेटवर्कबुलडाणा: येथून जवळच असलेल्या सावळा गावाला लागून असलेल्या डोंगरानजीकच्या शेतात सापडलेला जखमी मोर स्वाभिमानीचे प्रदेशाध्यक्ष रविकांत तुपकर यांच्या उपस्थितीत वन विभागाच्या स्वाधीन करण्यात आला. त्यामुळे जंगलात जखमी अवस्थेत पडलेल्या मोराला स्वाभिमानीच्या कार्यकर्त्यांमुळे जीवनदान मिळाले.सावळा येथील शेतकरी राजेंद्र तुपकर हे सोमवारी दुपारी जंगलानजीकच्या शेतात गेले असता त्यांना एका झाडाखाली जखमी आवस्थेत राष्ट्रीय पक्षी मोर आढळून आला. त्यांनी सदर मोराला पकडून घरी आणले व ही बाब रविकांत तुपकर यांच्या कानावर घातली. त्यानंतर तुपकरांनी ताबडतोब पशुवैद्यकीय डॉ. भानुदास जगताप यांना बोलावून त्या मोरावर प्राथमिक उपचार केले. त्यानंतर रविकांत तुपकर यांनी वन विभागाच्या अधिकार्यांना संपर्क केला व दुपारी ३ वाजता हा मोर राणी बगीचा येथील वन विभागत उपवन संरक्षक यांच्या कार्यालयात नेऊन तुपकर यांच्या हस्ते वन अधिकार्यांच्या स्वाधीन केला. यावेळी वन विभागाचे अधीक्षक शिंगणे, शेतकरी राजेंद्र तुपकर, डॉ. भानुदास जगताप, राणा चंदन, शत्रुघ्न तुपकर, विलास निकम, शे. रफिक करीम, शे. जुल्फेगार शेठ, हरीभाउ उबरहंडे, अमोल मोरे, योगेश सुरडकर, यज्ञजा तुपकर उपस्थित होते. सदर मोरावर राणी बागेत उपचार सुरू आहेत.
बुलडाणा : जखमी अवस्थेत आढळलेल्या मोराला दिले जीवदान!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 18, 2018 1:24 AM
बुलडाणा: येथून जवळच असलेल्या सावळा गावाला लागून असलेल्या डोंगरानजीकच्या शेतात सापडलेला जखमी मोर स्वाभिमानीचे प्रदेशाध्यक्ष रविकांत तुपकर यांच्या उपस्थितीत वन विभागाच्या स्वाधीन करण्यात आला. त्यामुळे जंगलात जखमी अवस्थेत पडलेल्या मोराला स्वाभिमानीच्या कार्यकर्त्यांमुळे जीवनदान मिळाले.
ठळक मुद्देसावळा जंगलात आढळलेला मोर वन विभागाच्या स्वाधीन