लोकमत न्यूज नेटवर्कबुलडाणा : मोताळा तालुक्यातील महाल पिंप्री शिवारातील शेती असलेले शेतकरे पीक विमा व खरीपाच्या अनुदानापासून वंचीत आहेत. शेतकºयांच्या खात्यात तातडीने अनुदान जमा करावे अशी मागणी स्वाभिमानी विद्यार्थी संघटनेचे जिल्हाध्यक्ष पवन देशमुख यांनी तहसिलदार यांच्याकडे निवेदनाव्दारे केली आहे. येत्या आठ दिवसात रक्कम जमा न झाल्यास तहसिल कार्यालयात बैठे सत्याग्रह करण्याचा इशारा निवेदनाव्दारे देण्यात आला. मोताळा तालुक्यातील महाल पिंप्री शिवारात शेती असलेल्या जवळपास २०० शेतकºयांच्या खात्यात अद्यापही २०१४-१५ च्या गारपीटीची नुकसान भरपाई, २०१५-१६ च्या पीक विम्याचे अनुदान आणि २०१६-१७ च्या खरीपाचे अनुदान जमा झाले नाही. ही बाब येथील शेतकºयांनी स्वाभिमानी विद्यार्थी संघटनेचे जिल्हाध्यक्ष पवन देशमुख यांना सांगितलली. देशमुख यांनी सर्व शेतकºयांना एकत्र करुन मोताळ्याचे तहसिलदार यांची भेट घेवून निवेदन सादर केले. दरम्यान, सदर लाभार्थी शेतकºयांच्या याद्या पटवारी यांनी तहसिलकडे पाठविल्या; मात्र आपल्या स्तरावरून सदर कामास विलंब होत असल्याचा आरोप देशमुख यांनी केला. येत्या आठ दिवसात सर्व शेतकºयांच्या अनुदानाची रक्कम त्यांच्या खात्यावर जमा न झाल्यास तहसिल कार्यालयात ठिय्या आंदोलन करण्यात येईल असा इशाराही पवन देशमुख यांनी निवेदनाद्वारे दिला आहे. यावेळी सय्यद वसीम, प्रदिप शेळके, महेंद्र जाधव, गोपाल खोंदले व टाकरखेड येथील शेतकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
बुलडाणा : शेतकऱ्यांच्या अनुदानासाठी स्वाभिमानी आक्रमक, आंदोलनाचा इशारा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 13, 2018 12:57 PM
बुलडाणा : मोताळा तालुक्यातील महाल पिंप्री शिवारातील शेती असलेले शेतकरे पीक विमा व खरीपाच्या अनुदानापासून वंचीत आहेत. शेतकऱ्यांच्या खात्यात तातडीने अनुदान जमा करावे अशी मागणी स्वाभिमानी विद्यार्थी संघटनेचे जिल्हाध्यक्ष पवन देशमुख यांनी तहसिलदार यांच्याकडे निवेदनाव्दारे केली आहे.
ठळक मुद्देआठ दिवसात अनुदान जमा करण्याची मागणी