लोकमत न्यूज नेटवर्कबुलडाणा : जिल्ह्यातील शिक्षकही आता कोरोना योद्धा म्हणून काम करत आहेत. पंचायत समिती स्तरावरून आरोग्य विभागाच्या कर्मचाऱ्यांसोबत शिक्षकांच्या ड्युट्या लावण्यात आल्या आहेत. शहरी भागातून गावात येणाºया प्रत्येक चेक पोस्टवर गुरूजींचा पहारा दिसून येत आहे. अंतरजिल्हा सिमेवरून जिल्ह्यात येणाºया प्रत्येक प्रवाशांची नोंदणी या शिक्षकांकडून केल्या जात आहे.आरोग्य विभागातील कर्मचारी, पोलीस कोरोनाच्या युद्धात प्राणपणाने लढत आहेत. कोरोना विषाणूमुळे निर्माण झालेल्या या आपत्कालीन परिस्थितीत शिक्षकही महत्त्वाची भूमीका बजावत आहेत. राज्यात साथरोग कायदा व राष्ट्रीय आपत्ती व्यवस्थापन कायदा अंतर्गत विविध उपाययोजना करण्यात येत आहेत. कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी बुलडाणा जिल्ह्याच्या सर्व सिमा बंद आहेत. जीवनावश्यक वस्तूंची वाहतूक व अत्यंत महत्त्वाच्या कामासाठीच जिल्ह्याची सिमा पार करता येते. त्यानुषंगाने प्रत्येक सिमेच्या ठिकाणी पोलीस बंदोबस्त आहे. बुलडाणा जिल्ह्यामध्ये प्रवेश करणाºया नागरिकांची तपासणी करण्यासाठी व त्यांची नोंद घेण्यासाठी शिक्षकांची नियुक्ती चेक पोस्टवर करण्यात आली आहे. जिल्ह्याच्या सिमेवरच नव्हे, तर शहरातून गावत येणाºया रस्त्यावरही शिक्षकांच्या ड्युट्या लावण्यात आल्या आहेत. वाहनातून येणारा प्रवासी कोठून आला, कोठे थांबणार, याची माहिती शिक्षकांकडून नोंदविण्यात येत आहे. चेकपोस्टवरील कर्मचाऱ्यांच्या जेवणाची व पाण्याची व्यवस्था नजीकचे पोलीस प्रशासनाकडून करण्यात येत आहे. कर्मचारी कर्तव्य सोडून गेल्यास किंवा गैरहजर राहिल्यास त्यांच्यावर कारवाई करण्यात येणार आहे.१२ तासाच्या शिप्टमध्ये कामबुलडाणा जिल्हांतर्गत आंतर जिल्हा सिमा सील करण्यात आलेल्या आहेत. सीमावर्ती चेकपोस्टवर दोन पोलीस, एक शिक्षक, एक आरोग्य कर्मचाºयांची नियुक्ती करण्यात आली आहे. १२ तासाच्या शिप्टमध्ये हे कर्मचारी कर्तव्य बजावत आहेत.आरोग्य विभागाकडे दिल्या जाते प्रवाशांची माहिती आरोग्य कर्मचाºयांनी आलेल्या प्रवाशांची थर्मल स्कॅनरद्वारे कपाळावर तापमान घेऊन ३८ अंश सेल्सिअसपेक्षा जास्त तापमान असलेल्या प्रवाशाला त्वरीत नजीकच्या शासकीय रुग्णालयात सुचना देण्यात येते. दररोज दिवस पाळीतील कर्मचाºयांनी सायंकाळी सहा वाजता आणि रात्र पाळीतील कर्मचाºयांनी सकाळी सहा वाजता एकुण प्रवाश्यांची तपशीलवार माहिती घेऊन आरोग्य अधिकारी कार्यालयाकडे कळविणे आवश्यक आहे.
बुलडाणा : चेक पोस्टवर गुरुजींचा पहारा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 26, 2020 11:02 AM