लोकमत न्यूज नेटवर्कबुलडाणा : प्रयोगशाळेत तपासणीसाठी पाठविलेल्या व रॅपिड अँटिजेंट टेस्ट कीटद्वारे तपासलेल्या अहवालांपैकी एकूण १८८० अहवाल प्राप्त झाले आहेत. त्यापैकी १५३९ अहवाल कोरोना निगेटिव्ह असून, ३४१ जणांचे अहवाल पॉझिटिव्ह आले आहेत. दरम्यान, तीनजणांचा कोरोनामुळे सोमवारी मृत्यू झाला. परिणामी जिल्ह्यात कोरोनामुळे आतापर्यंत ३०९ जणांचा मृत्यू झाला आहे.सोमवारी पॉझिटिव्ह आलेल्यांमध्ये बुलडाणा १६, पाडळी दोन, हतेडी खुर्द ३, खामगाव २४, आलमपूर ३, खरकुंडी २, अवधा ५, मलकापूर ३८, उमाळी २, हरसोडा ५, वाघुड २, चिखली १०, शेलगाव आटोळ २, सिं. राजा ६, साखरखेर्डा १६, शेंदुर्जन ३, दुसरबिड ३, वारोडी २, सावखेड तेजन २, सायाळा २, धा. बढे ११, आव्हा २, लिहा ३, मोताळा २, शेगाव ७, दे. राजा ८, लोणार ९, बिबी ४, चोरपांग्रा ३, तांबोळा २, लोणी २, पळसखेड २, वाघाळा ७, मेहकर १३, नांदुरा १०, जळगाव जामोद ८, आसलगाव ६, पि. काळे २, निंभोरा २, पळशी सुपो ३, आडोळ २, जळगाव जिल्ह्यात भुसावळ तालुक्यातील निंबोरा २, अकोला जिल्ह्यातील व्याळा येथील एक, जाफराबाद येथील एकाचा यामध्ये समावेश आहे.दरम्यान, खामगावातील शिवाजीनगर भागातील ७५ वर्षीय पुरुष, नांदुरा तालुक्यातील पोटा येथील ४५ वर्षीय पुरुष व जळगाव जामोद तालुक्यातील वडगाव येथील ६५ वर्षीय व्यक्तीचा कोरोनामुळे सोमवारी मृत्यू झाला. दुसरीकडे ८६३ जणांनी कोरोनावर मात केली. दरम्यान, आतापर्यंत ४० हजार ७९५ जणांनी कोरोनावर मात केली.
बुलडाणा : आणखी तिघांचा मृत्यू; ३४१ कोरोना पॉझिटिव्ह
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 13, 2021 11:35 AM